लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - १८ महाराष्ट्र बटालीयनच्या छात्र सैनिकानी ७१ किलोमीटर सायकलिंग बुधवारी विजय दिवस साजरा केला. ही मोहीम जळगाव ते पद्मालय पर्यंत पार पडली. या माेहिमेसाठी कॅप्टन कमल पाटील, लेफ्ट. जी.डी. भालेराव, लेफ्ट डॉ. योगेश बोरसे, लेफ्ट शिवराज पाटील,ज्योती मोरे यांचे मार्गदर्शन लाभले तर जिल्हा नियोजन अधिकारी रतापराव पाटील यांनीही सायकलिंगमध्ये सहभाग नोंदविला होता.
०००००००००००००००००००००००००
प्रगती विद्यामंदिर शाळेत शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला
----------------------------------------------
प्रगती विद्यामंदिर येथे पोषण आहार वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- प्रगती विद्यामंदिर येथे शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहार घेण्यासाठी आलेल्या पालकांना शासन निर्देशानुसार सोशल डिस्टंसिन् चे पालन करावे व मास्क लावून शाळेत यावे याविषयीं सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी प्रेमचंद ओसवाल, मंगलाताई दुनाखे तसेच सचिन दुनाखे, नितेश पालेशा यांची उपस्थिती होती.
००००००००००००००००००००००००००००
शासनाच्या जीआरची करणार होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- अधिसंख्या पदांबाबत शासनाने काढलेल्या जीआरची आदिवासी कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने २१ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात येणार आहे. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नितीन कांडेलकर, प्रल्हाद सोनवणे, राहुल सोनवणे, सुनीता कोळी, प्रशांत सोनवणे आदींनी केले आहे.
०००००००००००००००००००००००००
भालाणी यांची चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महेंद्रा ढाबा येथे नुकताच काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी आलेले भगत बालाणी यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासण्यात यावे व भगत बालाणी यांची चौकशी करून त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी रिपाइंच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे.