जळगाव : खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य (ज्वारी, मका, बाजरी) खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यात १९ भरडधान्य खरेदी केंद्र मंजूर केले आहे. या योजनेतंर्गत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आधारभूत किंमतीत व भरडधान्याच्या गुणवत्ता व दर्जानुसार खरेदी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.संकरीत ज्वारीसाठी आधारभूत किंमत व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर हा २६२० रुपये आहे. मालदांडी ज्वारीसाठी २६४० रुपये, बाजरीसाठी २१५०रुपये, मकासाठी १८५० रुपये आहे.भरडधान्य खरेदीकरीता तालुकानिहाय खरेदी केंद्रांचा तपशीलजळगाव : जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ. लि. जळगाव, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सह संस्था मर्याअमळनेर : अमळनेर तालुका शेतकी सहकारी संघ लि.पारोळा : पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघ लि.चोपडा : चोपडा तालुका शेतकरी सहकारी संघ लि.धरणगाव : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि.एरंडोल : एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघ लि.यावल : कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी. संघ लि.रावेर : रावेर तालुका शेतकरी सहकारी संघ. लि.मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका शेतकरी सहकारी संघ लि.बोदवड : बोदवड को. ऑप. खरेदी विक्री युनि.लि.भुसावळ : भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघ लि.जामनेर : जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघ.लि.पाचोरा : शेतकरी सहकारी संघ लि. पाचोरा.भडगाव : शेतकरी सहकारी संघ लि.चाळीसगाव : शेतकरी सहकारी. संघ लि. भडगाव.शेंदुर्णी : शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसा लि.याप्रमाणे १७ केंद्र आहेत तर आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत यावल-आदिवासी विकास विविध कार्यकारी सहकारी संस्था, हरीपुरा, ता. यावल व चोपडा-आदिवासी विकास विविध कार्यकारी सहकारी संस्था, कर्जाणा, ता. चोपडा याप्रमाणे दोन केंद्र मंजूर आहेत.जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील एकूण १९ भरडधान्य खरेदी केंद्रासाठी उप अभिकर्त्या संस्थांना मंजुरी देण्यात आली असून अधिक तपशीलासाठी संबंधित खरेदी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात १९ भरडधान्य खरेदी केंद्र मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 9:23 PM