आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - अनैतिक संबंधाच्या संशयावरुन महिला व पुरुषाची विवस्त्र धींड काढून त्यांना बांधून ठेवत मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या प्रकरणात जळगाव न्यायालयाने गुरुवारी नांदेड, ता.धरणगाव येथील १९ जणांना १ वर्ष कैद व आणखी वेगवेगळ्या कलमाखाली वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. याचप्रकरणातील दोन जणांची मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.राज्यभर गाजलेल्या या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागल होते. हा निकाल गुरुवारी १० रोजी सुनावण्यात आला.यांना झाली शिक्षाआबा उर्फ गजानन सोमनाथ कोळी, गोनट्या उर्फ गोकुळ सुरेश कोळी, विकास अशोक कोळी, भरत प्रकाश कोळी, उखर्डू देवचंद कोळी, महेश सुधाकर कोळी, विनोद नामदेव कोळी, रवींद्र नथ्थू कोळी, रामचंद्र भगवान कोळी, जीवन नेताजी कोळी, एकनाथ उर्फ छोटू रघुनाथ कोळी, दगडू अभिमन कोळी, भटू रमेश कोळी, संजय शालिक कोळी, सुभाष भिका कोळी,भरत उर्फ भुऱ्या पुंडलिक कोळी, विजय नारायण कोळी, ज्ञानदेव नागो कोळी, युवराज राजाराम कोळी यांना शिक्षा सुनावण्यात आली तर या गुन्ह्यातील ईश्वर राजाराम कोळी,नथ्थू पुंडलिक कोळी, बापू संतोष कोळी व भैय्या उर्फ समाधान नथ्थू कोळी हे चार जण मयत झाले आहेत. तर मंगल हरी सुतार, एकनाथ सोनु मोरे या दोघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे.सरकारतर्फे १८ तर बचावपक्षातर्फे ३ साक्षीदार तपासलेया खटल्यात सरकारपक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले तर बचावपक्षातर्फे ३ साक्षीदार तपासण्यात आले.यावेळी फिर्यादी पीडित महिला, तिची मुलगी, पीडित अनिल चौधरी, समाजसेविका अरुणा कणखरे, तपासाधिकारी एस.के. चव्हाण, पोलीस निरीक्षक योगराज शेवगण आदींच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या आहेत.दरम्यान, ही घटना समाजाला कलंक लावणारी व पीडितेच्या अब्रुचा प्रश्न असल्याने सर्व आरोपींनी प्रत्येकी एक हजार रुपये दोन्ही पीडितांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकारी वकील आशा शर्मा यांनी या खटल्यात अखेरपर्यंत जोरदार युक्तीवाद केला.जळगाव येथील न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड.आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.या खटल्याचा निकाल समाधानकारक असला तरी संशयितांना आणखी कठोर शिक्षा व्हावी यासाठी वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. स्त्री जातीला व समाजाला कलंक लावणारी ही घटना होती.-आशा शर्मा, सरकारी वकील
विवस्त्र धींड काढल्याप्रकरणी १९ जणांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:42 PM
नांदेड येथील प्रकरण
ठळक मुद्देअनैतिक संबंधाच्या संशयावरुन महिला व पुरुषाची घेतली होती अब्रूसरकारतर्फे १८ तर बचावपक्षातर्फे ३ साक्षीदार तपासले