लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात १९१ नवे रुग्ण आढळून आले असून २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे ग्रामीणमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याचे अहवालावरून समोर आले असून रविवारी ग्रामीणमध्ये ५७ बाधित आढळून आले असून तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरात नवे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक हे दिलासादाायक चित्र कायम असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटून २०१३ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांची संख्या २९ हजार ५९५ झाली असून यापैकी २७०९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२२ वर्षीय तरूणीसह ४ मृत्यू
शहरात एका २२ वर्षीय तरूणीसह ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात एक ३२ वर्षीय तरूण, ५१ वर्षीय प्रौढ व ५७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यासह यावल तालुक्यात ३, जळगाव तालुक्यात ३, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव या ठिकाणी प्रत्येकी २, पारोळा, रावेर, भुसावळ, अमळनेर या ठिकाणी प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. पाचोरा तालुक्यातील २२ वर्षीय तरुणीचा मृतांमध्ये समावेश आहे.
रविवारच्या चाचण्या अशा
ॲन्टीजन ७८७५, बाधित ७८६, पॉझिटिव्हिटी ९.९ टक्के
आरटीपीसीआरचे आलेले अहवाल : १५२८, बाधित २८४, पॉझिटिव्हिटी १८.५८ टक्के
आरटीपीसीआरच्या झालेल्या चाचण्या २३०४
प्रलंबित अहवाल ११८९
सक्रिय रुग्ण १०८८९
लक्षणे असलेले ३२४०
ऑक्सिजनवरील रुग्ण १७३८
आयसीयूतील रुग्ण ७९४