शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

१९२५ शाळांमधील गैरसोयींचे खोदकाम सुरु ! उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 5:43 PM

९ अधिकाऱ्यांवर सोपविली जबाबदारी

कुंदन पाटील

जळगाव : औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायय समितींच्या अंतर्गत असलेल्या शाळांच्या तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ९ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली ९ अधिकाऱ्यांच्या पथकाने जिल्ह्यातील १९२५ शाळांमधील गैरसोयींसह समस्यांची तपासणी सुरु करायला सुरुवात केली आहे. सोमवार अखेरीस ४३१ शाळांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांची पाहणी केली जाणार आहे.त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १९२५ शाळांची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांकरवी सुरु झाली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांवर तालुकानिहाय जबाबदारी सोपविली आहे.छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेतील परिस्थिती पाहून औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. त्यानुसार २१ जुलै रोजी शाळा तपासणीचे आदेश काढले आणि ६० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई सुरु आहे.

कसली होणार पाहणी?

शाळांमधील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होते. सरकारी अनेक शाळांच्या इमारतींच्या डागडुजीचा प्रश्न आहे. पाहणीत इमारत, वर्ग खोल्यांची स्थिती, डागडुजी, स्वच्छता, पिण्याची पाण्याची सुविधा आदी पाहिल्या जातील असे सांगण्यात येते. या तपासणीनंतर समिती अहवाल सादर करणार असल्याचे अधिकारी सुत्रांनी सांगितले. जिल्ह्यात दोन हजारांच्या घरात शाळा आहेत. त्यातील निवडक शाळांची पाहणी केली जाईल, असे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

शाळा तपासणीसाठी तालुकानिहाय जबाबदारीअधिकारी-पदनाम-तालुकेमहेश सुधाळकर-प्रांत, जळगाव-जळगाव व जामनेरजितेंद्र पाटील-प्रांत, भुसावळ-भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरकैलास कडलग-प्रांत, फैजपूर-यावल व रावेरगिरीश गायकवाड-प्रांत, एरंडोल-एरंडोल, धरणगाव व पारोळाभूषण अहिरे-प्रांत, पाचोरा-पाचोरा व भडगावप्रमोद हिले-प्रांत, चाळीसगाव-चाळीसगावमहादेव खेडकर-प्रांत, अमळनेर-अमळनेरएकनाथ भंगाळे-प्रांत, चोपडा-चोपडागजेंद्र पाटोळे-पुनर्वसन, उपजिल्हाधिकारी-जळगाव मनपा क्षेत्र.