जळगाव:९०च्या व त्यानंतरच्या दशकात खान्देशात काँग्रेस व आघाडीच्या नशिबातील यश व अपयशाचे चढउतार बघायला मिळाले. बाबरी मशिद विध्वंसानंतर झालेल्या धार्मिक दंगलींनंतर फटका बसलेल्या काँग्रेस व आघाडीने नंतर सावरत पुन्हा यश मिळविले. मात्र २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे खान्देशात काँग्रेसचा सुपडा साफ झाला. अनेक नामांकित खासदारांनी या मतदारसंघांचे नेतृत्व करून पक्षाला यश मिळवून दिले. सध्याच्या खान्देशातील नेतृत्वात ही क्षमता आहे का? हा सवाल उपस्थित होत आहे.४काँग्रेसने खान्देशातही ९०च्या दशकाची सुरूवात चार पैकी ३ जागा ताब्यात ठेवूनच केली.४६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिद पाडल्यानंतर झालेल्या धार्मिक दंगलींनंतर काँग्रेसचे खान्देशातही पानीपत झाले. चार पैकी केवळ नंदुरबारची एकमेव जागा १९९६ मध्ये जिंकता आली.४मात्र लवकरच अपयशातून सावरत काँग्रेसने १९९८ च्या निवडणुकीत चार पैकी ३ जागा पुन्हा खेचून घेतल्या. माणिकराव गावित, डी.एस.अहिरे, डॉ.उल्हास पाटील यांनी हे यश खेचून आणले.४परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारची जागा वगळता खान्देशातील उर्वरीत तिन्ही जागा भाजपाने हिसकावून घेतल्या.४मोदी लाटेमुळे काँग्रेस-राष्टÑवादीचा खान्देशातून पूर्णपणे सफाया झाला. चार पैकी एकही जागा काँग्रेस व आघाडीला राखता आली नाही. चारही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले.४राज्यात काँग्रेस व आघाडीने बऱ्यापैकी यश मिळविलेले असताना खान्देशात केवळ परंपरागत मतदार संघ असलेल्या नंदुबारची जागा जिंकता आली. उर्वरीत तिन्ही जागा भाजपाच्या ताब्यात गेल्या.४परंपरागत बालेकिल्ला असलेल्या नंदुबार मतदारसंघासह धुळ्याचीही जागा काँग्रेस व आघाडीने परत मिळविली. मात्र जळगाव, रावेरची जागा पूर्वीप्रमाणे भाजपाच्याच ताब्यात राहिली.
१९९१ ते २०१४: काँग्रेसच्या खान्देशातील वाटचालीचे चढउतार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:10 AM