जामनेर - शेतकऱ्यांच्या कापसाला ५८०० रुपये हमीभाव देण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तालुक्यातील तळेगाव येथे केली. याचबरोबर मक्याला १८०० रुपये हमीभाव दिला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.तळेगाव व शेळगाव येथील विविध विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. तालुक्यात विविध ठिकाणी त्यांच्या हस्ते कार्यक्रम झाले. ओझर बु येथील जि. प. शाळेच्या खोल्यांचे उद्घाटन त्यांनी केले.जामनेरला अद्ययावत हॉस्पीटलआरोग्याच्या काळजीसाठी रुग्णाला मुबई व पुणे येथे जाणयाची आवश्यकता पुढे राहणार नाही. जामनेरला सर्व सुविधा युक्त १०० पलंगांचे हॉस्पीटल काही दिवसातच सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कापसाला ५८०० रुपये हमीभाव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 10:08 PM