शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

घरातून लांबविली २ लाख ७० हजारांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:29 AM

जळगाव : जुने बी.जे.मार्केट परिसरातील गुजराथी गल्लीतील रहिवासी मीना दिनेश मल्लारा यांच्या घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने २ लाख ७० ...

जळगाव : जुने बी.जे.मार्केट परिसरातील गुजराथी गल्लीतील रहिवासी मीना दिनेश मल्लारा यांच्या घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजराथी गल्ली येथे मीना मल्लारा (५८) या मुलगा व सून यांच्यासह वास्तव्याला आहेत. मुलाचा व्यवसाय असल्यामुळे ते गुरूवारी सकाळीच कामाला निघून गेले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता मिना व त्यांची सून हे दोघे कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडले. त्यावेळी घरात तीन मोलकरीण आणि नात घरात होते. दुपारी काम आटोपून सुनेसह मीना मल्लारा घरी परतल्या. रात्री ८ वाजता त्यांनी घरातील कपाट उघडले असता त्यांना कपाटात ठेवलेले २ लाख ७० हजार रूपयांची रोकड दिसून आली नाही. त्यांनी मुलगा आणि सूनेला विचारणा केली असता त्यांनी आपण पैसे घेतले नसल्याचे सांगितले. अखेर मीना मल्हारा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली व अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.