जळगाव- प्लॅस्टिक मुक्त अभियानातंर्गत शिवकॉलनी येथील सरस्वती विद्यामंदीर शाळेत नुकतीच कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा पार पडली़ यामध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल १५० प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवून नागरिकांमध्ये वाटप केल्या.कार्यशाळेत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता़ प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाच कागदी पिशवी बनविल्या़ व परिसरातील व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, नागरिक यांना त्या कागदी पिशव्यांचे वाटप वाटप केले़ विद्यार्थ्यांनी १५० पिशव्या बनवून कायार्नुभव विषय प्रात्यक्षिक परीक्षामध्ये घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी केली जनजागृतीविद्यार्थ्यांनी पिशवी वाटप करताना कागदी पिशवीचा वापर करून पर्यावरणाला हातभार लावला, असा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना व व्यावसायिकांना दिला. यावेळी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष मनोज पाटील व मुख्यध्यापिका वसाने यांचे मार्गदर्शन लाभले. तर सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी परिश्रत घेतले.