जळगाव : कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असून सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात वीस मृत्यू झाले आहेत. गेल्या तीन दिवसात ६१ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी १०३३ रुग्ण आढळून आले असून ११०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एक पाच दिवसाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
यावल तालुका व जळगाव शहरात प्रत्येकी चार मृत्यू झाले आहेत. बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असताना दुसरीकडे मात्र, मृत्यू वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जळगाव शहरात २१२ तर भुसावळात १३०, अमळनेरात १०५ तर चोपडा तालुक्यात ८७ रुग्ण आढळून आले आहेत. चोपडा तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ हजाराच्या खाली गेल्याने काहीसा दिलासा आहे.