ऑनलाईन लोकमत/किशोर पाटील
जळगाव, दि.26 - पावसाळ्यात विजेमुळे होणा:या अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आह़े गेल्या 22 दिवसात खान्देशात वीजेचा धक्क्यामुळे 20 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यात एक बालक व दोन महिलांचा समावेश आहे.
पावसाळ्यात विजेचा प्रवाह जास्त असतो़ घरातील अर्थिग सुस्थितीत असल्यास त्यामुळे अपघाताचा धोका कमी असतो़ अर्थिग नसल्याने विजेचा धोरदार धक्का बसून जीव जाण्याची शक्यता असत़े यामुळे महावितरणच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना अपघात टाळण्यासाठी दक्षता घेण्याबाबत तसेच प्रतिबंधक उपायोजनाबाबत माहिती देण्यात येते. मात्र त्याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आह़े़ तर काही घटनांमध्ये वीजचोरीही जीवावर बेतत आह़े
अपघाताची प्रमुख कारणे
घरात पाण्याचे विद्युत मोटारीला स्पर्श, कपडे वाळत घालण्यासाठी वीज खांबास वा विद्युत प्रवाहित होईल अशा ठिकाणी बांधलेली विद्युत संवाहक तार , घरातील लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल (जाळी) तसेच फ्रिज, कुलर, मिक्सर, इस्त्री, गिझर, पाण्याची मोटार आदी विद्युत उपकरणांमध्ये विद्युत प्रवाह उतरून स्पर्श झाल्याने, विद्युत खांब वा स्टे वायरला स्पर्श, शेतात ओल्या हाताने पंप सुरु करताना, शेतातील कृषी पंपात अर्थिगमध्ये वीजप्रवाह उतरल्याने स्पर्श होवून, वीजतारांवर आकडा टाकताना, ही अपघाताची प्रमुख व वारंवार दिसून येणारी कारणे आहेत. लोंबळणा:या तारांबाबत उपायायोजना केल्या जात नसल्याने त्यामुळे दुर्घटनांना सामोरे जावे लागत आह़े
दोन लाखांवरून आता चार लाख रूपये आर्थिक मदत
विजेच्या धक्का लागून मृत्यू झालेल्या घटनाचा विद्युत निरिक्षकांमार्फत संबंधित प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात येतो़ विद्युत निरिक्षकाच्या अहवालात जर महावितरण विभागाची चूक असल्याचे निदर्शनास आले, तर मयताच्या वारसास आर्थिक मदत करण्यात येत़े गेल्या वर्षार्पयत दोन लाख रूपये मदत दिली जात होती़ जानेवारी 2017 पासून मदतीत वाढ झाली आह़े आता मयताच्या वारसास चार लाख रूपयांर्पयत मदत देण्यात येत असल्याची माहिती महावितरण जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली़
महावितरणच्या उदासीन कारभाराचे दोन बळी
किशोर हरी बाविस्कर (30)आणि संदिप हिलाल बाविस्कर (28) दोन्ही रा. गोरगावले (चोपडा) या जळगाव तालुक्यातील भोलाणे (जळगाव) येथील शौच खडडयाचे काम करत होत़े यादरम्यान खोदकाम पूर्ण झाल्याची लोखंडी पाईपाच्या सहाय्याने खात्री करताना विद्युत तारांना पाईपाच्या स्पर्श झाल्याने किशोर बाविस्करला जोरदार वीजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर संदीप बाविस्कर हा जखमी झाला होता़
पाचोरा तालुक्यातील चुंचाळे येथे दुचाकीवरून घराकडे परतत असताना अंगावर वीजतारा कोसळल्याने उमेश रामकिसन झंवर (वय 47, रा़ बाळद ता़) यांचा मृत्यू झाला होता़
अनेक ठिकाणी जीर्ण तसेच लोंबकळणा:या तारा आहेत़ याबाबत महावितरणकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आह़े त्याकडे महावितरण लक्ष देणे गरजेचे आह़े
महावितरणकडून वेळावेळी दुरूस्तीची कामे केली जात असतात़ मात्र जोरदार वादळामुळे विद्युत खांब कोसळतात़,तारा तुटतात व दुर्देवी घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने मृत्यू होतो़ नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता़