शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

वृक्ष तोडल्याने 20 हजारांचा दंड

By admin | Published: February 10, 2017 12:46 AM

मनपा पर्यावरण विभागाची कारवाई : गणपतीनगरातील प्रकार, ठरावाची पहिल्यांदाच अंमलबजावणी

जळगाव : गणपती नगरातील अशोक वृक्ष व उंबराचे झाड तोडल्याप्रकरणी मनपा पर्यावरण विभागाने कन्हैय्या छाबडिया यांना 20 हजाराच्या दंडाची नोटीस बजावली आहे. दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांना एका पत्राव्दारे देण्यात आला आहे. गणपती नगरातील तारा अपार्टमेंटमधील रहिवासी कन्हैय्या छाबडिया यांनी अपार्टमेंट परिसरातील अशोक व उंबराचे झाड मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे कोणताही अर्ज न देता विना परवानगी तोडले असल्याची मनपाकडे तक्रार करण्यात आली होती.याची दखल घेऊन प्रभाग अधिका:यांच्या माध्यमातून स्थळ पाहणी करण्यात आल्यानंतर तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आले होते. याची गंभीर दखल घेऊन उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी छाबरिया यांना गुरूवारी नोटीस बजावली. प्रति झाड 10 हजार दंडमनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या निर्णयानुसार प्रति झाड 10 हजार असे एकूण 20 हजाराच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात दंडाची  रकम मनपाकडे भरली जावी व पावती सादर        करावी, असे कळविण्यात आले   आहे.  मुदतीत दंडाची रकम भरली न गेल्यास आपल्या विरूद्ध महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 मधील तरतूदीनुसार व वृक्ष प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही या नोटीसीमध्ये देण्यात आला आहे.वृक्ष प्राधिकरण समितीची 15 रोजी बैठकमनपा वृक्ष प्राधिकरण समितीची गेल्या महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत विना परवानगी वृक्ष तोडल्यास दंडात्मक कारवाईचा ठराव करण्यात आला होता. या ठरावाची पहिल्यांदाच अंमलबजावणी करून ही कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची गेल्या महिनाभरात सभा झालेली नव्हती. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बैठका लांबल्या. आता वृक्ष प्राधिकरण समितीची येत्या 15 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. शहरातील विविध भागातील नागरिक तसेच संस्थांकडून झाडे तोडण्याची परवानगी मागणारे 20 अर्ज वृक्ष प्राधिकरण समितीकडे प्राप्त झाले आहेत. मागणी नुसार स्थळ पाहणीची अहवाल प्रशासनाकडून मागविण्यात आला असून त्यानंतरच परवानगी दिली जाईल.