उन्हाळी सुटय़ांसाठी केवळ 3 गाडय़ा : 15 पासून शाळांच्या फे:या बंद
जळगाव,दि.5- नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी गडावर पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव होत आहे. यासाठी जिल्ह्यातील भाविकांसाठी राज्य परिवहन विभागाच्या जळगाव विभागाकडून 4 ते 12 एप्रिल दरम्यान 200 जादा फे:या सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक एस.साबळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सप्तशृंगी गडावर दरवर्षी यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातील अनेक भाविक जात असतात. त्यामुळे यात्रोत्सवादरम्यान एसटीला नफा व्हावा यासाठी एसटीकडून 200 जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहे. यांनी दिली आहे. गेल्या वर्षी एसटीकडून 180 जादा गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. मात्र भाविकांचा या ठिकाणी जाण्याची गर्दी पाहता यंदा एसटीकडून 20 गाडय़ा वाढविण्यात आल्या आहेत. तसेच भाविकांच्या संख्येत वाढ झाल्यास 11 एप्रिल रोजी गाडय़ांचा संख्येत वाढ करण्यात येणार आहे.
नफा नसल्याने सुटय़ांसाठी 3 जादा गाडय़ा
15 एप्रिल पासून जिल्ह्यातील शाळांना सुट्टय़ा लागणार आहेत. सुटय़ांदरम्यान पर्यटनासाठी बाहेर जाण्याचा बेत अनेकजण आखत असतात. यासाठी एसटीकडून दरवर्षी एसटीकडून जादा गाडय़ा सोडण्यात येत असतात. मात्र यंदा एसटीकडून केवळ 3 जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहे. गेल्यावर्षी एसटीकडून उन्हाळी सुट्टीसाठी 28 गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. मात्र यंदा एसटीकडून केवळ 3 गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी उन्हाळी सुटय़ांमध्ये एसटी प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळेच गाडय़ांचा संख्येत घट झाली आहे. यंदा एप्रिल महिन्यात लगAाचे मुहूर्त नसल्याने एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. एसटीकडून पाचोरा-माहुरगड, अमळनेर-कल्याण, भुसावळ-मेहतर या तीन गाडय़ा सोडण्यात येणार आहे. तसेच गुजरातमधील सुरत व अहमदबाद गाडय़ांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली आहे.
शाळांच्या 250 फे:या बंद करणार
एसटीकडून विद्याथ्र्यासाठी सोडण्यात येणा:या 250 गाडय़ा 15 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. 15 एप्रिल रोजी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपत असल्याने एसटीकडून 13 जूनर्पयत या फे:या बंद करण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर या गाडय़ा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही एसटीकडून सांगण्यात आले.