जळगाव : आयसीएमआरतर्फे जिल्हाभरात सिरो सर्व्हे राबविण्यात आला होता़ या सर्व्हेक्षणाचे निष्कर्ष समोर आले असून जिल्ह्यातील ३९६ लोकांच्या रक्तनमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर दोघांना कोरोना होऊन गेला मात्र, त्यांना कसलीही कल्पना नव्हती़ या अंदाजानुसार जिल्हाभरातील २० हजार जनतेला कोरोना होऊन गेला असेल किंवा तो असू शकतो, असा अंदाज या सर्व्हेक्षणातून समोर आलेला आहे़ दरम्यान, राज्यभरात सहा जिल्ह्यांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात आले होते़विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारकक्षमता कशापद्धतीने व कितीप्रमाणात लोकांमध्ये विकसित झालेली आहे, यासाठी ही अॅण्टीबॉडीज तपासणी करण्यात आली होती़ यात जिल्ह्यातील दहा गावांमध्ये पंधरा जणांच्या पथकाने प्रत्येकी चाळीस असे ४०० जणांचे रक्तनमुने संकलित केले होते़ त्यात ३८६ नमुने तपासण्यात आले़ या नमुन्यांवर चेन्नई येथे संशोधन करण्यात आले़ त्यानंतर या सहाही जिल्ह्यांच्या तपासणीनंतर एकत्रित निष्कर्ष समोर आलेले आहेत़या ठिकाणचे घेतले होते नमुनेयावल तालुक्यातील मोहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगाव तालुक्यातील कडगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातील वरखेडे, पाचोरा येथील नाईकनगर, जामनेर येथील गोराडखेडा, भुसावळ येथील वॉर्ड नं ४५, जळगाव येथील वॉर्ड नं ५७, चाळीसगाव येथील वॉर्ड नं २८ या ठिकाणच्या प्रत्येकी दहा घरांची निवड करून तेथील प्रत्येकी चार अशा चाळीस जणांची प्रत्येक गावातून तपासणी करण्यात आली होती़ जिल्ह्यातील ४०० जणांची तपासणी करण्यात आली़ हे नमुने काही दिवस जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे होते़ नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांच्याकडे जबाबदारी होती़राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने चाचण्या झाल्या़ त्याद्वारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा (अॅण्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.कोविड रुग्णालयातून रुग्ण पळाल्याने यंत्रणेत खळबळ; पुन्हा दाखल केले रुग्णालयातममुराबाद, ता. जळगाव : स्वत:ला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सोमवारी दाखल झालेल्या गावातील एका तरूणाने मंगळवारी सकाळी पलायन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस व आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, संबंधितास पुन्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.ममुराबाद येथील पटेलवाड्यातील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय तरूणाने सोमवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे रूग्णालय गाठून आपण इटारसी येथील एका रूग्णालयात भरती होतो आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी त्यास तातडीने भरतीसुद्धा करून घेतले होते.रात्रभर रूग्णालयात थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा डोळा चुकवून पलायन केले. काही वेळानंतर घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर रूग्णालय प्रशासनाची पाचावर धारणाच बसली. संबंधित तरूण खरोखर कोरोना पॉझिटिव्ह असल्यास विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका संभवतो, हे लक्षात घेऊन वैद्यकीय अधिक्षकांनी जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याला त्यासंदर्भात लगेच माहिती दिली. तरुणाने दिलेल्या पत्त्यावरून पोलीस व आरोग्य यंत्रणा ममुराबाद गावात पोहोचली व त्याचा सगळीकडे शोध घेण्यात आला.संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर अखेर तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. उगाच जोखीम नको म्हणून पोलिसांनी त्याला तशाच अवस्थेत पकडून पुन्हा जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले आहे. आई व पत्नीसह पटेलवाड्यात वास्तव्यास राहणाºया त्या तरूणामुळे संपूर्ण गाव मात्र वेठीस धरले गेले.काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील गोपाळपुरा भागात राहणाºया कोरोना बाधित रुग्णाने चुकून ममुराबादचा पत्ता दिल्याने अशाच प्रकारे खळबळ उडाली होती.वृद्धेच्या मृत्यूप्रकरणात डॉक्टरांची नवी तपास समितीमालती नेहते या वृद्ध महिलेच्या मृत्यू प्रकरणात तीन डॉक्टर्सची एक नवीन चौकशी समिती नेमून पुन्हा नव्याने चौकशी सुरु करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा या समितीकडून तपास करून अहवाल सोपविला जाणार आहे़ या समितीने कामही सुरू केल्याचे समजते़ बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह आठ दिवसांनी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार कोविड रुग्णालया समोर आला होता़ या पार्श्वभूमीवर तत्कालीन डीन डॉ़ भास्कर खैरे यांनी तीन डॉक्टरांची एक समिती नेमली होती़ या समितीने एका दिवसात सर्व माहिती व तपासणी करून अहवाल दिला होता़ यात अधिकाºयांनी तपासणी करणे गरजेचे होते़ जे कर्तव्यावर होते, त्यांनी लक्ष द्यायला हवे होते, असे काही निष्कर्ष काढले होते़ यावरुन डीन खैरे यांनी निलंबित होण्याआधी दोन कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाईही केली होती़ नवीन डीन डॉ़ रामानंद यांनी पुन्हा तीन डॉक्टर्सची समिती दोन दिवसांपूर्वी स्थापन केल्याचे सूत्रांकडून समजते़ यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे़ समितीने काही जणांचे जबाब नोंदविण्याचे कामही केले आहे़ काही नवीन मुद्दे समोर आल्यास, प्रशासनाकडे बाजू मांडली गेल्यास डॉक्टर्सवरील कारवाई मागे घेण्याच्या हालचाली होण्याची शक्यता यातून वर्तविण्यात आली आहे़ मात्र, आपण ही समिती नेमली नसून आधीचीच समिती असल्याचे डॉ़ रामनंद यांनी म्हटले आहे़महिलेच्या मृत्यू प्रकरणात डीन, वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे़ डॉक्टरांवरील कारवाईला अनेकांनी विरोध दर्शविला आहे़मालेगावच्या डॉक्टरांसोबत पालकमंत्र्यांची चर्चामालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही डॉक्टर्ससोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी चर्चा केली़ मालेगावात नेमक्या कोणत्या उपाययोजना कशा पद्धतीने राबविण्यात आल्या़ याची माहिती त्यांनी घेतल्याचे समजते़ यानंतर त्यांनी अधिष्ठाता डॉ़ रामानंद यांच्यासोबतही चर्चा केली. मालेगावात नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याने मालेगाव पॅटर्नच्या चर्चा सुरू झाल्या आहेत़ त्या पार्श्वभूमीवर सर्वांचे सहकार्य घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.
२० हजार नागरिकांना कोरोना होऊनही अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:05 PM