जळगाव : सौम्य किंवा अति सौम्य लक्षणे असलेल्यांना गृह विलगीकरणाचा पर्याय शासनाकडून काही नियम व अटींच्या अधीन राहून उपलब्ध करून दिला असून त्यानुसार जिल्हाभरात २०९ बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़अनेक बाधितांना कसलीही लक्षणे नसणे किंवा अगदी सौम्य लक्षणे असणे असतात़ प्रत्येक पॉझिटीव्ह येणारा रुग्ण हा प्रशासनाचा ताण वाढविणारा असतो, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे़ अशा स्थितीत या ज्यांना काहीच लक्षणे नाहीत, अशांना घरीच ठेवून उगाच प्रशासकीय यंत्रणा का त्यात अटकवायची, असा विचार गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होता़ वाढलेली मागणी, वाढलेले रुग्ण त्यामानाने उपलब्ध नसलेले मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्यास योग्य राहील असा सूरही उमटत होता़ शिवाय अन्य ठिकाणी होम आयसोलेशनचा पर्याय खूप आधीपासूनच उपलब्ध करून देण्यात आला होता़ मात्र, जळगावात तो उपलब्ध झालेला नव्हता़ अखेर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासंदर्भात आदेश काढले़काय आहेत अटीकुटुंबाच्या नावांचा तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या शिफारशीनुसार हमीपत्र भरणे तसेच डॉक्टरांची गृह उपचारांसाठी परवानगी आवश्यक़घरात एकच कुटुंब वास्तव्यास असावे, स्वतंत्र शौचलय, बाथरूम सुविधा या सुविधा आहेत किंवा नाही याची खातरजमा तलाठी, ग्रामसेवक आरोग्य कर्मचाऱ्यांनी करून संबधित प्रशासकीय यंत्रणेला त्याची माहिती द्यावी़ तेव्हा गृह विलगीकरणाची परवानगी मिळते.६० वर्षावरील किंवा अन्य व्याधी असलेल्यांना अशी परवानगी नसेल़ असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २५ जुलैला काढले होते़
जळगावात जिल्हाभरात २०९ बाधित रुग्ण गृह विलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 12:46 PM