शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

जळगावात अपघाताचे 21 ‘ब्लॅक स्पॉट’

By admin | Published: July 13, 2017 12:56 PM

अहवालानंतर आता उपाययोजना करण्यात येणार आहेत.

ऑनलाईन लोकमत / सुनील पाटील जळगाव, दि. 13 - वारंवार अपघात होऊन त्याठिकाणी जीव गमवावा लागलेले आहेत, असे जळगाव शहर व परिसरात 31 ‘ब्लॅक स्पॉट’ पोलीस दलाने निश्चित केले आहेत. यातील सर्वाधिक ठिकाणे हे महामार्गावरील आहेत. जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय व राज्यमार्गावरील अशा ठिकाणांची संख्या ही 113 इतकी आहे. दरम्यान, या अहवालानंतर आता उपाययोजना करण्यात येणार आहेत.विनय कोरे यांच्याकडून अपघातांबाबत प्रबोधनया समितीने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात 113 तर शहर व परिसरात 31 ‘ब्लॅक स्पॉट’ आढळून आले आहेत. दरम्यान, अपघात कसे होतात, ते रोखण्यासाठी काय केले पाहिजे, अपघातात जीव कसे वाचविता येवू शकतात याबाबत मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व अपघाघातांचे अभ्यासक विनय मोरे हेशाळा, महाविद्यालयात जाऊन सादरीकरण करीत आहेत. या मोहीमेतून 20 टक्के अपघात रोखता आले तरी हेतू साध्य होईल, असा विश्वास कराळे यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, रस्ता दुरुस्ती व तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसाठी आर्थिक निधीची गरज असल्याने कराळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सर्वेक्षणाची माहिती दिली. व मदतीसाठी साकडे घातले आहे.अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आराखडा जिल्ह्यात दीड वर्षात 1 हजार 417 अपघात झाले असून त्यात 657 जणांचे मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू हे 20 ते 50 या वयोगटातील पुरुषांचे झालेले आहेत. दिवसाला सरासरी 5 अपघात होतात व त्यात दोन जणांचा मृत्यू होतो. ही धक्कादायक बाब पुढे आल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झाले आहेत.अशा ठिकाणांचे गेल्या आठडय़ात पोलीस व आरटीओच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले.तीन पोलीस अधिका:यांची समिती गठीतया सर्वेक्षणासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर, राहुलकुमार पाटील व पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील या तीन पोलीस अधिका:यांची समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अपघाताचे विदारक छायाचित्र, व्हिडिओ, अपघात घडतानाचे दृश्य व अपघातानंतर त्याची विदारकता स्पष्ट करणारे छायाचित्र, व्हिडिओ संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. असे आहेत पोलीस स्टेशननिहाय शहर व परिसरातील ब्लॅक स्पॉटजिल्हा पेठ : आकाशवाणी चौक, अग्रवाल चौक, मानराज पार्क, शिव कॉलनी स्टॉप जळगाव शहर : शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पूल, गोविंदा रिक्षा स्टॉपशनी पेठ : कालिंका माता चौक, एस.टी.वर्कशॉप.जळगाव तालुका : हॉटेल राधिकानजीक, बांभोरी जकात नाका, गुजराल पेट्रोल पंप, खोटे नगर बसस्टॉपएमआयडीसी : दूरदर्शन टॉवर, इच्छादेवी चौक नर्सरी, रिलायन्स पेट्रोल पंप, सुप्रीम कॉलनी स्टॉप, जळके-विटनेर फाटारामानंद नगर : शिव कॉलनी रेल्वे पूल, शिव कॉलनी स्टॉप, विद्युत कॉलनी स्टॉप, चिनार गार्डन हॉटेलसमोर, मानराज पार्कनशिराबाद : नशिराबाद बसस्टॉप, मुंजोंबा मंदिर, मन्यारखेडा बायपास, पाटील नर्सरीनजीक, टोयोटो शोरुमनजीकधरणगाव : पाळधी बायपास, बांभोरी पूल, मुसळी फाटा व एकलगA गाव