शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

३० ऐवजी रेशनवर मिळतोय २१ किलो गहू

By admin | Published: March 29, 2017 12:30 AM

्ररेशन दुकानदारांची मनमानी : जामनेर तालुक्यात पुरवठा विभागाचे डोळ्यावर कातडे

जामनेर : तालुक्यात शासनाने अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकेवर ग्राहकाला मार्च महिन्यासाठी २ रुपये  दराने ३० किलो गहू उपलब्ध करून दिला आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकाला ३० किलोऐवजी फक्त २१ किलो गहू देत असल्याच्या तक्रारी असून, याबाबत ‘लोकमत’ने स्टिींग केले असता ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी गहू देऊन उर्वरित गव्हाचा काळाबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे, दरम्यान, पुरवठा अधिकाºयांचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.गव्हाचा काळाबाजार?दारिद्र्यरेषेखालील कुटुंंबासह अन्य आर्थिक दुर्बल जनतेला शासनाकडून दरमहा अत्यल्प किमतीमध्ये गहू मिळतो. महिन्याकाठी  कार्डावर गहू २१ किलो व १४ किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र चालू महिन्यात   स्वस्त धान्य दुकानदारांकडून  दोन रुपये किलो दराने ३० किलो गहू  व पाच किलो तांदूळ देण्याचे शासनाने नियोजन केले असले तरी याचे विपरीत चित्र दिसत आहे. कार्डधारकाला पूर्वीप्रमाणेच २१ किलो गहू व ५ किलो तांदूळ देण्याची पद्धत रेशन दुकानदारांनी अवलंबली आहे.  ग्राहकांची दिशाभूल करून एका कार्डामागे तब्बल  ९ किलो  गव्हाचा मलिदा हे दुकानदार  लाटत असून, या गव्हाचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचे चित्र आहे.६ हजार क्विंटलचा साठा  तालुकाभरातील अंत्योदय योजनेचे लाभार्थी १० हजार ४५२, तर प्राधान्य कुटुंंब शिधापत्रिकाधारक १७ हजार ९७८  असे  एकूण २८ हजार ४५० कुटुंबांसाठी सुमारे ६ हजार क्विंटल गव्हाचा पुरवठा या महिन्यात करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना  पुरवठा विभागाकडून गहू फक्त १ रुपया ३० पैसे प्रती किलोने वितरित केला जातो, तर ग्राहकासाठी गव्हाचा दर शासनाने फक्त दोन रुपये किलो ठेवला आहे.दरम्यान, अंत्योदय योजनेत प्रती कार्ड २१ किलोऐवजी आता ३० किलोचे वाटप शासनाने जाहीर केले असले तरी ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दुकानदार प्रती कार्ड २१ किलो गहू वितरित करीत आहे तर प्राधान्य कार्डावर १८ किलो गहू वितरित करीत आहेत. काळ्याबाजारातून चांदीस्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून १ रुपया ३० पैसे किलो दराने मिळणारा हाच गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी गेला तर त्या गव्हाचा भाव चक्क  २ हजार रुपये ते २२०० रुपये क्विंटलपर्यंत जातो. यावरून रेशन दुकानदारांची चांदी होत  असून अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची तालुकाभरात सध्या चर्चा रंगू लागली आहे.  तालुक्यात दोन रुपये किलो दराने ३० किलो गहू कार्डावर मिळत असल्याची माहितीच अद्यापपर्यंत अनेक ग्राहकांना नसल्याचा गैरफायदा सध्या दुकानदारांनी घेतला असून  त्यांना आवर कोण घालणार, हा प्रश्न  सध्या अनुत्तरित असाच  आहे. अधिकाºयांचे दुर्लक्षतालुक्यात मोठ्या प्रमाणावर स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांची फसवणूक करतात, हक्काचे गहू काळ्याबाजारात विक्री करीत असूनसुद्धा अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत    आहे.स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी तालुक्यात पावणेदोनशे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यातील अनेकांकडे तीन ते चार दुकानांची मालकी असल्याचेही सांगण्यात येते.  अनेक दुकानदार आपला कारभार मनमानीपणे चालवित असल्याच्यादेखील तक्रारी आहेत. त्यात दुकान वेळेवर न उघडणे, एका महिन्यात केवळ पाच ते सात दिवसच दुकान उघडणे, दुकानात दक्षता समिती तसेच पुरवठा साठा यांचे फलक न लावणे, पुरेशा प्रमाणात ग्राहकांना धान्याचा पुरवठा न करणे, चालूृ महिन्यातील धान्य दुसºया महिन्यात ग्राहकांना देणे असे मनमानी प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असले तरी एकाही दुकानदारावर पुरवठा विभागाकडून कारवाई झालेली नाही.  परिणामी नवनियुक्त तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी प्रत्येक दुकानाची चौकशी करून गैरकृत्य करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.                            शिधापत्रिकाधारकास शासन नियमानुसार धान्य वाटप न करणाºया दुकानदाराबाबत तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाईल. शिधापत्रिकाधारकास शासनाने निर्धारित केलेल्या दरातच वाटप केले जावे. याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले जातील.-नामदेव टिळेकरतहसीलदार, जामनेर मार्च महिन्यात अंत्योदय कार्डावर ३० किलो गहू ,                 ५ किलो तांदूळ शासनाने उपलब्ध केला आहे. जर कुणी दुकानदार ग्राहकांची फसवणूक करीत त्याला कमी धान्य देत असेल तर त्या दुकानदारांची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवारीही करू.             -अतुल सानप,                      पुरवठा निरीक्षक, जामनेर