कुंदन पाटीलजळगाव : नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी तालुकानिहाय २१ मतदान केंद्र जाहीर करण्यात आले आहेत. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या क्रमांकानिहाय ही मतदान केंद्र निश्चीत करण्यात आली आहेत.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि.२४ रोजी निवडणुक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १३ हजार ५६ मतदार आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला आहे. त्यानुसार ही मतदान केंद्र जाहीर करण्यात आली आहेत. जळगाव शहरात तीन तर अमळनेर, चाळीसगाव आणि भुसावळमध्ये प्रत्येकी दोन मतदार केंद्र आहेत. अन्य तालुक्यात मात्र प्रत्येकी एक केंद्र आहेत. मतदान केंद्र निश्चितसाठी प्रशासनाने शहरातील मध्यवर्ती सभागृह, शाळांना प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे मतदारांना लांबचा प्रवास करावा लागणार नाही. राजकीय प्रतिनिधींची बैठक
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणुक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. या बैठकीत मतदारांची संख्या, मतदार याद्यांतील दुरुस्तीसह अन्य प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राजकीय प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सुनिल माळी, किरण राजपूत उपस्थित होते.
तालुकानिहाय मतदान केंद्रचोपडा-तहसील कार्यालययावल-तहसील कार्यालयरावेर-तहसील कार्यालयमुक्ताईनगर-तहसील कार्यालयबोदवड सभागृह, तहसील कार्यालयभुसावळ-डी.एस.हायस्कुल जळगाव-आर.आर.विद्यालय, लाठी विद्यामंदिरधरणगाव-तहसील कार्यालयअमळनेर-राजसारथी सभागृह व तहसील कार्यालयपारोळा-तहसील कार्यालयएरंडोल-तहसील कार्यालयभडगाव-तहसील कार्यालयचाळीसगाव-चव्हाण महाविद्यालयपाचोरा-तहसील कार्यालयजामनेर-जि.प.शाळा हॉल.