जळगाव : मंगळवार आणि बुधवारच्या बंदनंतर आता गुरुवारी जिल्हाभरात पुन्हा एकदा लसीकरण वेगाने सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी बुधवारी सायंकाळी २१ हजार ६५० डोस प्राप्त झाले आहेत. त्यात २०,४५० डोस कोविशिल्डचे तर १२०० डोस कोव्हॅक्सिनचे आहेत.
मंगळवारी जळगाव जिल्ह्यात फक्त १ हजार ८१७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तर बुधवारी जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर ठणठणाट होता. जिल्हाभरात फक्त १४९ नागरिकांनाच लस देण्यात आली. मात्र बुधवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्याला २१ हजार ६५० नवे डोस मिळाले आहेत. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा एकदा लसीकरणाला वेग येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शासनाने १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले आहे. तर त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला वेग आला आहे.
सोमवारी जिल्ह्यात १७ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती. मात्र लगेच पुढील दोन दिवस लसीकरण केंद्रे बंद होती. आता पुन्हा जिल्ह्याला नवीन लसींचे डोस मिळाले आहेत.
या आठवड्यात असे झाले लसीकरण
२४ मे १७,६७१
२५ मे १,८१७
२६ मे १४९
लसीकरणाचा साठा
जिल्हा सामान्य रुग्णालय, रेडक्रॉस आणि रोटरी भवन - कोविशिल्ड ५४०० कोवॅक्सिन २००
जामनेर उपजिल्हा रुग्णालय कोविशिल्ड - ३००
चोपडा कोविशिल्ड २००
मुक्ताईनगर कोविशिल्ड ३००
चाळीसगाव कोविशिल्ड १००
पारोळा कोविशिल्ड २००
अमळनेर कोविशिल्ड १००
पाचोरा कोविशिल्ड १५०
रावेर कोविशिल्ड ४००
यावल कोविशिल्ड १०० कोव्हॅक्सिन - ५०
भडगाव कोविशिल्ड २०० कोव्हॅक्सिन १००
बोदवड कोविशिल्ड२००
एरंडोल कोविशिल्ड ३००
भुसावळ रेल्वे रुग्णालय कोविशिल्ड ४०० कोव्हॅक्सिन १००
धरणगाव कोविशिल्ड ३००
भुसावळ नगरपालिका रुग्णालय कोविशिल्ड ३०० कोव्हॅक्सिन १००
शाहू हॉस्पिटल कोविशिल्ड ३००० कोव्हॅक्सिन २००
प्राथमिक आरोग्य केंद्र भुसावळ कोविशिल्ड १००
बद्री प्लॉट, भुसावळ कोविशिल्ड २००
ग्रामीण रुग्णालय पाल कोविशिल्ड १०० कोव्हॅक्सिन १००
ग्रामीण रुग्णालय पहुर कोविशिल्ड १००
अमळनेर झामी चौक, कोविशिल्ड ३००
न्हावी ता. यावल कोविशिल्ड २०० कोव्हॅक्सिन ५०
सावदा कोविशिल्ड ३२० कोव्हॅक्सिन १००
मेहरुणबारे कोविशिल्ड १००
ग्रामीण रुग्णालय, अमळनेर कोविशिल्ड १००
वरणगाव फॅक्टरी कोविशिल्ड १३०
एनयूएचएम पाचोरा कोविशिल्ड १५०
एनयूएचएम चोपडा कोविशिल्ड १००
एनयूएचएम चाळीसगाव कोविशिल्ड १००
फैजपूर कोविशिल्ड १००
जळगाव सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे कोविशिल्ड ६१६०
डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय कोविशिल्ड ४०