धरणगाव /पिंप्री : तालुका कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून धरणगाव , पाळधी व पिंप्री येथील कृषी केंद्रांची व गोडावूनची तपासणी केली. यावेळी दुकानाच्या दर्शनी भागात साठा फलक न लावलेल्या व साठा रजिस्टर न नोंदविलेल्या तालुक्यातील २२ कृषी केंद्र संचालकांना या भरारी पथकाने नोटीसा बजाविल्या.या पथकाने अचानक कृषी केंद्राची रासायनिक खताच्या गोडावून व दुकानातील साठा तपासणी केली. भरारी पथकामध्ये गुणवत्ता नियंत्रक तथा प.स.तालुका कृषी अधिकारी एस.डी.पाटील , तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी , यांचा समावेश होता सदरील पथकाने धरणगाव ,पाळधी व पिंप्री परिसरातील सर्व कृषी केंद्रांची कसून तपासणी केली. या प्रसंगी रासायनिक खतांचे गोडावून तपासण्यात आले तसेच युरियाचा साठा प्रत्येक गोडावून मध्ये जाऊन तपासण्यात आला. तसेच कृषी केंद्रामध्ये असलेल्या त्रुटी संदर्भात कृषी केंद्र धारकांना समाज देण्यात आले. तर २२ दुकानांना नोटीस देण्यात आल्या.
साठा फलक व नोंदी नसल्याने २२ कृषी दुकानदारांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 6:40 PM