जळगाव : गावागावात, गल्ली गल्लीत कोरोनाच्या रॅपीड अॅण्टीजन टेस्ट होत असल्या तरी हे प्रमाण राज्याच्या चाचण्यांच्या तुलनेत चार हजार चाचण्यांनी कमी आहे़ जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत विचार केला तर ३ टक्क््यांपर्यंत लोकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत व जेवढ्या चाचण्या झाल्या त्यांत २२ टक्के लोक बाधित आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण सद्यस्थितीत २२ टक्के असल्याचा निष्कर्ष काढता येतो़ अधिकांश चाचण्या होण्याची गरज असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ झपाट्याने होत असताना चाचण्यांची संख्या मात्र, अत्यंत कमी होती़ अतिजोखीमीचे संपर्क व कमी जोखीमीचे संपर्क पाहिजे त्या प्रमाणात तपासले जात नव्हते़ त्यामुळे रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात दाखल होत होते व मृत्यूचे प्रमाणही मंध्यतरीच्या काळात प्रचंड वाढले होते़ यावर केंद्रीय समितीनेही आक्षेप नोंदविला होता़ त्यानंतर जुलै महिन्यात रॅपीड अॅन्टीजन चाचण्यांना सुरूवात करण्यात आली व त्यानंतर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली़ जेथे दिवसाला तीनशे ते चारशे चाचण्या होत होत्या़ तेथे चार ते पाच हजारांवर चाचण्या केल्या जात आहे़ रोज येणाऱ्या अहवालांचे प्रमाणही वाढले आहे़ मात्र, सद्यस्थितीत ते पुरेसे नसून वाढलेले संसर्ग बघता चाचण्यांचे प्रमाण अधिक वाढविणे गरजेचे असल्याचे चित्र आहे़ चाचण्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आढळून येणाºया पहिल्या दहा जिल्ह्यात जळगावचा समावेश झाला होता़ त्यावेळी चाचण्यांचे प्रमाण वाढविणे व ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवणे अशा काही सूचना या जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत़ अशा स्थितीत चाचण्यांचे प्रमाण अधिक वाढविणे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे़ मात्र, गेल्या पाच महिन्यातील विचार केला असताना जळगाव जिल्हा दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांच्या बाबतीत राज्यापेक्षा सहा हजार चाचण्यांनी मागे होता़
कोरोनाच्या एकूण चाचण्यांपैकी २२ टक्के बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 12:26 PM