जळगाव : शहरातील एका खासगी डॉक्टरांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ तर कोविड रुग्णालयात कार्यरत एका डॉक्टरांचा एक अहवाल निगेटीव्ह आला आहे़ दरम्यान, शहरात पुन्हा नवे २२ कोरोना बाधित आढळून आलेले आहेत़ संसर्ग वाढतच असून नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे़कोविड रुग्णालयात कार्यरत उपचाराची जबाबदारी असणाऱ्या एका डॉक्टर्सचा कोरोना तपासणी अहवाल हा स्थानिक प्रयोगशाळेतून निगेटीव्ह आला होता़ मात्र, हे डॉक्टर उपचारासाठी पुणे येथे गेल्याचे समजते़ दरम्यान, उपचाराचीच जबाबदारी असलेले एक डॉक्टर आधिच बाधित आल्याने कोविड रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या घटली असून त्यामुळे अन्य डॉक्टरांवर ताण वाढला आहे़ यासह एक कर्मचारीही बुधवारी बाधित आढळून आला होता़या ठिकाणी आढळले रुग्णशहरात या ठिकाणी आढळले रुग्ण शिवाजीनगर, वाल्मिकनगर प्रत्येकी ३ कांचननगर, उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येकी दोन शिवाजीनगर नवीन घरकूल, मयुर कॉलनी पिंप्राळा, जैनाबाद, तानाजी मालुसरे नगर, अक्सानगर, मोहमदिया कॉलनी, रामानंद नगर, मुदंडा नगर, लक्ष्मी नगर, रामेश्वर कॉलनी, समता नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत़जिल्ह्यात ७ मृत्यूजिल्ह्यात गुरूवारी चोपडा तालुक्यात ४५ वर्षीय व ६५ वर्षीय पुरूष, अमळनेर तालुक्यातील ६७ वर्षीय वृद्ध, भुसावळ तालुक्यातील ४८ वर्षीय प्रौढ, चाळीसगाव तालुक्यातील ६० वर्षीय तर जामनेर तालुक्यातील ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे़वेगळ्या पद्धतीने संशोधनाच्या हालचालीजळगावातील वाढलेले मृत्यू बघता या परिसरातील कोरोना व्हायरस हा अधिक धोकादायक पद्धतीत मोडणारा आहे का? या दृष्टीने संशोधन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे़ जिल्ह्यातील एकूण मृत्यूपैकी २५ टक्के मृत्यू हे २४ तासाच्या आत झालेले आहेत़ त्यामुळे धुळे महाविद्यालयाकडून काढण्यात आलेल्या निष्कर्षात जळगावाचाही उल्लेख आहे़जिल्ह्यात कोरोना तब्बल २५० मृत्यू झाले आहेत़ रुग्ण संख्या वाढल्यामुळे मृत्यूदर कमी झाला असून आठवडाभरापूर्वी ८ टक्यांवरील हा मृत्यूदर सहा टक्क््यांवर आलेला आहे़ सद्यस्थितीतही कोरोनाने होणारे मृत्यू पूर्णत: रोखण्यात प्रशासनाला यश आलेले नाही़ त्यात अन्य व्याधी व वयस्कर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असणे, रुग्ण उशिरा रुग्णालयात येणे अशी काही कारणे प्रशासनाकडून सांगितली जात असतात़ मात्र, धुळे शासकीय महाविद्यालयाने काढलेल्या निष्कर्षात जळगावचाही उल्लेख आल्यामुळे जळगावातील मृत्यंच्या बाबतीतही तसे काही संशोधन होऊ शकेल का याबाबत चाचपणी सुरू असल्याचे चित्र आहे़२५ जणांची कोरोनावर मातशहरातील कोविड केअर सेंटरमधून कोरोनातून बरे झालेल्या २५ रुग्णांना घरी सोडणत आले़ यावेळी या ठिकाणी उत्तम सेवा मिळाली असून नागरिकांनी लक्षणे जाणवल्यास न घाबरता थेट शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असा संदेश या रुग्णांनी दिला आहे़ जळगाव शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करण्यात येते़ या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जातात़ या ठिकाणी वेळेव सर्व औषधी व सर्व जेवण अत्यंत व्यवस्थितपणे मिळाले़ डॉक्टरांनी आमचे धिर देत आमचा विश्वास वाढविला त्यामुळे आम्ही कोरोनाव मात केली तसेच ताप, खोकला व लक्षणे आढळले तर आधी तपासणी करा, या रुग्णालयात कसलीही अडचण नाही, रुग्णालयांना घाबरू नका, असे या रुग्णांनी म्हटले आहे़ शहरातून बरे झालेल्यांची संख्याही ५५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे़
जळगाव शहरात एका डॉक्टरसह २२ नवे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 1:01 PM