इन्फो :
तक्रार करूनही करावी लागती प्रतीक्षा :
काही शेतकरी बांधवांनी सांगितले की, रोहित्र जळाल्यावर गावातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तक्रार करण्यात येते. तक्रारीनंतर महावितरणचे कर्मचारी रोहित्राची पाहणी करून जातात. मात्र, नवीन रोहित्र नेमके कधी बसविण्यात येईल, हे सांगितले जात नाही. त्यामुळे तक्रार करूनही नवीन रोहित्रासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
--
सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात २२९ रोहित्र बंद
::
इन्फो :
पर्यायी विजेची व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसान :
शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. वीजपुरवठा नसल्यामुळे १० ते १५ दिवस पिके पाण्यावाचून राहतात. परिणामी पिके कोमेजून उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतर्फे वर्तविण्यात येत आहे.
इन्फो :
सर्वच पिकांना बसतोय फटका :
रोहित्र जळाल्यावर जोपर्यंत नवीन रोहित्र बसविले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी लागवड केेलेल्या सर्वच पिकांना फटका बसतो. यामध्ये विशेषत: मका, ऊस, हरभरा या पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
इन्फो :
शेतकऱ्यांनी रोहित्राबाबत तक्रार केल्यावर महावितरणतर्फे चौकशी करून, लागलीच नवीन रोहित्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. काही दिवसांतच नवीन रोहित्र बसविण्यात येते. तसेच महावितरणकडे रोहित्रासाठी ऑइलचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे.
फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण.
::
इन्फो :
रोहित्र जळाल्यावर महावितरणकडे तक्रार केल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी नवीन रोहित्र बसविले जात नाही. त्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. परिणामी वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे पिकांवर परिणाम होऊन, उत्पादनातही घट होते.
संजय ढाके, शेतकरी