लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अमलात आणली. या योजनेतून जळगाव जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या अशा एकूण २७५६ शाळांमधून शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो; परंतु शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी लाकडांचाच वापर करावा लागतो. त्यामुळे शाळेच्या आवारात शालेय पोषण आहार शिजविताना चुलीतून धूर निघत होता. या धुरावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने आता झालेय पोषण आहार चुलीवर शिजविणाऱ्या शाळांना गॅस कनेक्शन देण्याचे ठरविले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २३३९ शाळांना गॅस कनेक्शन दिले जात असल्याने या शाळा धूरमुक्त होणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील २७५६ शाळांतून शालेय पोषण आहार दिला जातो. त्यापैकी ३४६ शाळांमध्ये आधीच गॅस कनेक्शन आहे, तर २३३९ शाळांमध्ये गॅस कनेक्शन नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये चुलीवरच पोषण आहार शिजविला जात होता; परंतु आता गॅसवर हा पोषण आहार शिजविला जाणार आहे. ज्या शाळांकडे गॅस कनेक्शन नाही, अशा शाळांची यादी शिक्षण विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच शाळांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. परिणामी, स्वयंपाकी महिलांना चूल फुकण्याचा त्रास कमी होणार आहे.
- कोट
जळगाव तालुक्यातील २०९ शाळांमध्ये गॅस कनेक्शन नाही. अशा शाळांची यादी जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे. लवकरच गॅस कनेक्शन शासनाकडून मिळणार आहे. यामुळे शाळा धूरमुक्त होणार आहेत.
- सतीष चौधरी, गटशिक्षणाधिकारी, जळगाव
==================
शापोआ लाथार्थी एकूण शाळा
- २७५६
==================
गॅस नसलेल्या शाळा
- २३३९
==================
- गॅस कनेक्शन नसलेल्या तालुकानिहाय शाळांची संख्या
भुसावळ : ९६
रावेर : १४२
अमळनेर : १७७
एरंडोल : १०३
धरणगाव : १२६
चोपडा : २००
जामनेर : २०२
भडगाव : १३१
चाळीसगाव : २४४
जळगाव : २०९
मुक्ताईनगर : १३०
पारोळा : १२१
पाचोरा : २०९
बोदवड : ६५
यावल : १८४