कुंदन पाटील, जळगाव : शहरातील २ हजार ३७४ ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात सौर ऊर्जा यंत्रणेच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ६८ लाख ६४ हजार ७७४ युनिटस् वीज निर्मिती केली आहे. तर जिल्ह्यातील ४९१९ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ५८ हजार ५०६ युनिट विजेची निर्मिती केली असून त्यापैकी १ कोटी ८५ लाख ५० हजार ४६४ युनिटस् वीज महावितरणला पुरविली आहे. त्यामुळे राज्यातील वीज निर्मितीवरचा भार कमी करण्यात जळगावकरांचा मोलाचा वाटा ठरला आहे.
सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा म्हटले जाते. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३० टक्के ऊर्जा परावर्तित होते तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे.सौर ऊर्जेचा उपयोग रोजच्या व्यवहारांमध्ये नियमित होत नसल्याने तिला अपारंपरिक ऊर्जा म्हणतात. सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जाचा एक मोलाचा स्रोत आहे. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी फोटोव्होल्टेइक सिस्टिम, केंद्रीकृत सौर ऊर्जा आणि सौर वॉटर हीटरचा वापर होतो. यापैकी सौर ऊर्जा निर्मितीसाठी २३७४ जळगावकर ग्राहकांनी पुढाकार घेत वीज निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील या ग्राहकांची संख्या ४९१९ इतकी आहे.
जळगाव, भुसावळ आघाडीवर
सौर ऊर्जा यंत्रणेच्या वापर करण्यासाठी जळगावसह भुसावळ तालुका आघाडीवर आहे. भडगाव, पारोळा तालुका मात्र पिछाडीवर आहे. जिल्ह्यातील महावितरणच्या वीज केंद्रांतर्गत एकट्या जळगाव आणि भुसावळ तालुक्यातून होणारी वीज निर्मिती जवळपास पावणे तीन कोटी युनिटच्या घरात आहे.
साडे तीन कोटी विजेची उचल
सौर ऊर्जा यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४९१९ ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केली आहे. त्यातून महावितरणकडून वापरासाठी १ कोटी ८५ लाख ५० हजार ४६४ युनिट वीज घेतली आहे. त्यात सर्वाधिक विजेची उचल जळगावचे केली आहे.
तालुकानिहाय सौर ऊर्जा यंत्रणेच्या माध्यमातून होणारी विजेचा प्रती युनिट तपशीलतालुका ग्राहक ग्राहकाने दिलेली वीज सौर ऊर्जा निर्मित युनिटस्भुसावळ ८५९ २७५४६९९ ६१३९९५१ जामनेर १०५ ४९२८६१ १७२२५५६चाळीसगाव ५११ ९२१६५४ २०६२३३५अमळनेर २३८ ७२४४७३ १२०६१७८चोपडा ९७ ३९५३१४ ७२६४१८धरणगाव ११३ ३५८६२७ ८४९५२५एरंडोल ९३ ३२९०७९ ६२२७०७जळगाव २३७४ ३८८३९२४ २६८६४७७४बोदवड २३ ७९०६७ १५५८४८मुक्ताईनगर ३८ १४५८८३ २९८३९५पाचोरा ३३४ १३१७१३३ ५३७७२३८भडगाव ६७ १८७६५५ २८५१८८रावेर १५८ ५०९०६७ १०९४३८७यावल १३५ ४०९०२८ १०५६३०८एकूण ४९१९ १८५५०४६४ ४८४५८५०९
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"