जळगाव : ‘तुमचे एटीएम बंद झाले आहे, ते सुरु करुन देतो’ असे सांगून ‘एटीएम’वरील कोड विचारुन तरसोद (ता.जळगाव) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची 23 हजार 500 रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर कक्षातील कर्मचा:यांनी तत्काळ खाते बंद करुन सूत्र हलविल्याने त्यातील 18 हजार 500 रुपये 24 तासात परत मिळविले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, तरसोद येथील रहिवाशी तुकाराम खंडू पाटील हे जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. नशिराबाद येथील युनियन बॅँकेत त्यांचे बचत खाते आहे. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. मी मुंबईच्या बॅँकेतून शर्मा बोलतो आहे, असे सांगून त्याने पाटील यांना तुमचे बॅँक खाते आधारकार्डशी न जोडल्यामुळे तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. हे एटीएम मी सुरु करुन देतो त्यासाठी जुन्या एटीएमवरील क्रमांक विचारला. हा क्रमांक घेतल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल असे सांगितले. थोडय़ा वेळाने एटीएमचा ‘ओटीपी’ (ऑनलाईन ट्रान्झक्शन पासवर्ड) विचारला. पाटील यांनी तोही क्रमांक दिला. ही सर्व माहिती संबंधित व्यक्तीने विश्वासात घेवून विचारली. मोबाईल बंद झाल्यानंतर पाटील यांच्या खात्यातील 18 हजार 500 रुपये व त्यानंतर पुन्हा 5 हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला.
सायबर कक्षाच्या कर्मचा:यांनी हलविले सूत्रबॅँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी मी तुमच्या बॅँकेत येतो असे सांगितले, मात्र त्यांनी तुम्ही येवू नका तुमचे काम झाले असे सांगून फोन बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांना हा प्रकार संध्याकाळी मुलगा प्रफुल्ल पाटील यांना सांगितला. दुस:या दिवशी दोघंही पिता-पूत्र स्थानिक गुन्हे शाखेत आले. तेथील कर्मचारी संदीप साळवे, श्रीकृष्ण पटवर्धन, जयंत चौधरी, विजय चौधरी व नरेंद्र वारुळे यांनी संपूर्ण माहिती समजून घेत पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या सल्ल्याने तातडीने ऑनलाईन सूत्र हलविले. त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळाला व दुस:या दिवशी 18 हजार 500 रुपये परत मिळण्याचे संकेत मिळाले. दरम्यान, ही प्रक्रिया करीत असतानाही पाटील यांना संबंधित व्यक्तीचा त्यांना फोन आला होता. ही व्यक्ती आसामची असल्याचे निष्पन्न झाले.
एटीएमचे पासवर्ड विचारुन ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही बँक खातेदारांना फोन करीत नाहीत व माहिती विचारत नाहीत,त्यामुळे नागरिकांनी कोणालाही फोनवर माहिती देवू नये. माहिती विचारण्याचा प्रय} झाला तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक