आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.६-मुख्यमंत्र्यांनी शहराच्याविकासासाठी२५ कोटीचा निधी दिला असला, तरी या निधीची स्थिती सध्या ‘मालामाल विकली’ चित्रपटातील लॉटरीच्या तिकीटासारखी झाली आहे. ज्या प्रमाणे एका लॉटरीच्या तिकीटावर सर्व गाव तुटून पडले होते. त्याच प्रमाणे २५ कोटीच्या निधीवर देखील सर्व गाव तुटून पडले असल्याचा टोला आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना लगावला.
शहरातील ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सोमवारी ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उदघाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ‘घंटा’ वाजवून करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकाºयांनी २५ कोटींचा मुद्या उपस्थित केला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळीअखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यकारीसदस्यश्रीपाद जोशी, स्पर्धेचे समन्वयक विनोद ढगे, स्पर्धेचे परीक्षक अरुण शेलार, सुभाष कुमावत, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
इन्फो-आमदारांनी २५ कोटीतून बंदिस्तनाट्यगृह पूर्ण करावे-जिल्हाधिकारीजळगावला नाट्याची मोठी परंपरा लाभली असून, अनेक युवा कलावंत देखील जळगावात सध्या तयार होत आहे. युवा कलावंताच्या कलेला वाव मिळावा यासाठी शहरात राज्यातील सर्वात मोठे बंदिस्तनाट्यगृह तयार होत असून, उर्वरित काम झाले की लवकरच या नाट्यगृहाचे उदघाटन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे यांनी यावेळीदिली. तसेच नाट्यगृहाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आमदार भोळेंनी त्यांच्याकडील २५ कोटीच्या निधीतून काही रक्कम द्यावी अशीअपेक्षाही व्यक्तकेली.
निधीचे वितरण माझ्याकडे असतेतरनाट्यगृहासाठी१कोटीदिलेअसते-भोळेजिल्हाधिकाºयांनी आपल्या भाषणात २५ कोटींचामुद्याउपस्थितकेल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनीआपलेमनोगतव्यक्तकेले.ते म्हणाले की, २५ कोटीच्या निधीची स्थिती ‘मालामाल विकली’ चित्रपटातील लॉटरीच्या तिकीटासारखी झाली आहे. हानिधी कोणालाही मिळत नसून केवळ टोलवाटोलवी सुरु आहे. ज्या प्रमाणे सर्व गाव लॉटरीच्यातिकीटावर तुटून पडले होते. त्याच प्रमाणे २५ कोटीच्या निधीवर देखील संपूर्ण गाव तुटून पडले आहे. त्या निधीचे वितरण माझ्याकडे नसून जिल्हाधिकाºयांकडे आहे. माझ्या हातात राहिले असते तर नाट्यगृहासाठी १ कोटी देवून दिले असते असा टोला आमदार भोळे यांनी जिल्हाधिकाºयांनालगावला.यावेळीसभागृहातचांगलाच हशा पिकला.
नाट्य कलावंताना सुविधा देण्यास अपूर्ण पडलोजीवन हे देखील नाटक असून, प्रत्येकाला यामध्ये नाटक करावेच लागते. नाट्य कलावंत सर्व दैनंदिन कामकाज बाजूला सारुन आपल्या नाट्यातून समाजाचे प्रश्न मांडत असतात. मात्र नाट्यकलावंताना ज्या सुविधा पाहिजेत, त्या सुविधा पुरविण्यास लोकप्रतिनीधी म्हणून सर्वच जण कमी पडले आहेत. मात्र जळगावात देखील बंदिस्तनाट्यगृह तयार होत असून, यामुळे नाट्यकलावंताना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे आश्वासन आमदार सुरेश भोळे यांनी दिले.