जळगाव : मनपाने महासेभत मंजूर केलेल्या 25 कोटीच्या कामाचा प्रस्ताव हा शासनाकडे न जाता दीड महिन्यापासून मनपाच्या बांधकाम विभागात पडून आहे. त्यातील कामांच्या अंदाजपत्रकातील त्रुटी दुरुस्ती करून कामातील घोळ निस्तरण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षापूर्वी जळगाव दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मनपाला हे 25 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. महापौरांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा निधी मिळविल्यानंतर आधीच्या प्रस्तावातून ती 4 कोटीची कामे वगळून अन्य कामे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तातडीने हा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यास आता दीड महिन्यांचा कालावधी लोटला असला तरीही प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे सादर झालेला नाही. काही त्रुटी या प्रस्तावांमध्ये आढळल्याने तसेच नगरसेवकांकडूनही सातत्याने बदल सुचविण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अद्यापही मनपाच्या बांधकाम विभागाकडेच पडून आहे.
25 कोटींचा ठराव मनपातच पडून
By admin | Published: January 15, 2017 12:37 AM