आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्णत्वास आली असून यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत १ कोटीने घट होऊन २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात कोणत्या कामांवर किती खर्च करावा यासाठी जि.प. अध्यक्षांच्या दालनात बुधवारी जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापतींसह विविध विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. अर्थसंकल्पास निधीची मर्यादा असल्याने अतिरीक्त खर्च टाळून उपलब्ध निधीत कामे करण्यासाठी काही विषयांमध्ये दुरुस्ती करण्याचे सुचविण्यात आले आहे.जि.प. च्या उपकर अनुदान, वाहनकर, उपकर सापेक्ष अनुदान, पाणीपट्टी, जिल्हा निधीतून मिळणारे व्याज यातून मिळणा-या स्वत:च्या उत्पन्नातून जि.प. अर्थसंकल्पाचे नियोजन केले असून यात साडेनऊ कोटी शासनाचे जिल्हा निधीतून मिळणारे व्याज ९ कोटी तर ४ कोटींचे नियोजन केले. या अर्थसंकल्पात विषयानुसार निधीची तरतुदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागाकडून आलेल्या कामांची आवश्यकता जाणून घेत प्रत्येक विभागाला असलेल्या निधीनुसार कामांचे नियोजन करण्यात आले. तसेच काही कामांमध्ये पदाधिकाºयांनी दुरुस्ती सांगितल्याने त्यात सुधारणा केली जाईल.
जळगाव जि.प.च्या अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:26 PM
आढावा बैठक
ठळक मुद्देउपलब्ध निधीत कामे करण्याबाबत पदाधिकाऱ्यांच्या सूचनाअतिरीक्त खर्च टाळून उपलब्ध निधीत कामे करण्यासाठी काही विषयांमध्ये दुरुस्ती