ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या 25 कोटींच्या निधीतून करावयाच्या कामांच्या प्रस्तावाचा प्रवास आता पुन्हा महापालिकेकडे सुरू झाला असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सहमती दर्शविलेल्या कामांप्रमाणे फेरप्रस्ताव सादर करावा असे जिल्हाधिका:यांकडून मनपास पत्र देण्यात आले आहे . शहरातील रस्ते विकासाच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षापूर्वी मनपास 25 कोटींचा विकास निधी देण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी 25 कोटींचा विकास निधी जाहीर केला मात्र तो मिळावा म्हणून महापालिकेकडून सतत पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी मनपातील पदाधिका:यांच्या मंत्राल्यात नगरविकास विभागाकडे दोन ते तीन वा:या झाल्या. जिल्हा दौ:यावर पुन्हा आलेल्या मुख्यमंत्र्यांना याबाबत महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी हा निधी महापालिकेस तात्काळ वितरीत होईल असे आश्वासन दिले होते. मनपास निधी द्यावा लागणार म्हणून नगरविकास विभागाने जिल्हाप्रशासनामार्फत मनपाने कामांचे प्रस्ताव सादर करावे असे आदेश केले होते.
25 कोटींचे प्रस्ताव पुन्हा मागविले
By admin | Published: May 17, 2017 6:40 PM