ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) सदस्य निवडणुकीत बुधवारी माघारीच्या दिवशी जिल्हा परिषद गटातील 17 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. एक सदस्य माघार घेण्यासाठी निर्धारीत वेळेपक्षा उशिरा पोहचल्याने त्यांचा अर्ज कायम राहिला आहे. आता पालिका गटातील आठ जागांसाठी 23 व जिल्हा परिषद गटातील 2 जागांसाठी 3 असे 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी आता 7 सप्टेंबर रोजी मतदान होईल. यापूर्वी आठ महिला बिनविरोध झाल्या होत्या. ग्रामीण मतदारसंघाच्या (जिल्हा परिषद) 27 तर लहान नागरी मतदारसंघाच्या (पालिके) 9 अशा एकूण 36 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. ग्रामीण मतदारसंघाच्या आठ जागा यापूर्वीच बिनविरोध झालेल्या आहेत. तर लहान नागरी मतदारसंघाच्या अनुसुचित जमातीसाठी एक जागा रिक्त राहणार आहे. येथे दोघे महिलांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे 27 जागांसाठी निवडणूक होणार होती. त्यात लहान नागरी मतदारसंघाच्या आठ जागा व ग्रामीण मतदारसंघाच्या 19 जागांवर उमेदवार होते. आता ग्रामीण मतदारसंघाच्या 19 पैकी 18 जागांवरील उमेदवार बिनविरोध झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी राहुल मुंडके काम पाहत आहेत. लहान नागरी मतदारसंघातील रिंगणातील उमेदवार असे : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (एक जागा) - विजया पवार, जयश्री पाटील, कल्पना महाजन. नागरिकांचा मागास प्रवर्ग (एक जागा)- प्रवीण चौधरी, राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे. सर्वसाधारण महिला प्रवर्ग (तीन जागा) - विजया जावळे, पुष्पलता पाटील, कल्पना महाजन, सोनल महाजन, वर्षा शिंदे. सर्व साधारण प्रवर्ग (दोन जागा) -सुनील काळे, राजेंद्र चौधरी, यशवंत दलाल, भालचंद्र जाधव, पुष्पलता पाटील, मनोज पाटील, मुकेश पाटील, विनय भावे, मंगेश तांबे, महेंद्र धनगर, अमोल शिंदे, मिलिंद वाघुळदे. ग्रामीण मतदारसंघातील यापूर्वी बिनविरोध झालेल्या महिला सदस्या अशा (सर्वसाधारण) नीलम शशिकांत पाटील, वर्षा रामदास पाटील, पल्लवी जितेंद्रपाटील, विद्या दिलीप खोडपे, धनुबाई आंबटकर, कल्पना पाटील, जयश्री अनिल पाटील, विजयाबाई पाटील. ग्रामीण मतदार संघातील बिनविरोध झालेले उमेदवारअनुसुचित जाती- जयपाल बोदडे, अनुसुचित जाती (महिला) - सविता भालेराव, अनुसुचित जमाती- नीलेश पाटील, प्रभाकर सोनवणे, ना.मा.प्र. (महिला)- माधुरी अत्तरदे, नंदा पाटील, मिना पाटील.पूर्ण माहिती मिळेनाजिल्हा प्रशासनातर्फे ग्रामीण मतदार संघातील सर्वसाधारण प्रवर्गातील 8 जागा व अनुसुचीत जमाती महिला प्रवर्गाच्या 2 जागांसाठी कोणत्या उमेदवारांनी माघार घेतली? व कोणते उमेदवार बिनविरोध झाले याची माहिती रात्री उशीरार्पयत उपलब्ध होऊ शकली नाही. ग्रामीण मतदारसंघातील ना.मा.प्र.साठी मतदाऩ ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निवडणक होणार आहे. यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये गोपाल चौधरी, भूषण पाटील, हिंमत पाटील हे रिंगणात आहेत.