चोपडा, जि.जळगाव : भाजपाचे येथील नेते घनश्याम अग्रवाल यांचे वडील ओंकारलाल गौरीलाल अग्रवाल यांच्या स्मृती दिनानिमित्त ओंकारनगरात ६० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दूध वाटप करण्यात आले, तर अग्रवाल समाजाच्या वतीने अग्रेसन भवन येथे २० झाडांचे रोपण करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमाला नगराध्यक्षा मनीषा चौधरी, उद्योजक आशिषभाई गुजराथी, चोसाका माजी चेअरमन अॅड.घनश्याम पाटील, जि.प.चे माजी सदस्य व सेनेच्या महिला जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील, पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, मनसेचे नेते अनिल वानखेडे, तहसीलदार दीपक गिरासे, शेतकी संघाचे चेअरमन चंद्रशेखर पाटील, व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील, चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, डॉ.विकास हरताळकर, डॉ.विजय पोतदार, डॉ.दुर्गेश जैस्वाल, राजेंद्र सोनवणे, कवी रमेश जे.पाटील, पं.स.चे माजी सदस्य नामदेव बाविस्कर, डॉ.चंद्रकांत बारेला, सूतगिरणी संचालक शशिकांत पाटील, तुकाराम पाटील, भाजपा किसान सेल तालुकाध्यक्ष विनोद पाटील, दीपक पाटील, नगरसेवक महेश पवार, गजेंद्र जैस्वाल, राजाराम पाटील, बापू चौधरी, उद्योजक संजय अग्रवाल, सेनेचे मनोहर पाटील, घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे नितीन निकम, अशोक अग्रवाल, करण अग्रवाल, पवन अग्रवाल, चंदूलाल पालिवाल, दगडू अग्रवाल, सुरेश बडगुजर, सागर पठार, रमेश अग्रवाल, सरपंच रावसाहेब पाटील, मिलिंद पाटील, हातेड येथील माजी सरपंच मनोज सनेर, रवींद्र मराठे, सागर बडगुजर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील व जिल्हा बँकेचे संचालक डॉ.सुरेश श्यामराव पाटील यांनीदेखील घनश्याम अग्रवाल यांच्या घरी भेटी दिल्या होत्या.घनश्याम पाटील व आशिषभाई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंच्लन दोडे गुजर संस्थान संचालक प्रवीण पाटील यांनी केले होते.
केरळ पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 5:21 PM