१८११ गुन्हे दाखल : ७६४ जणांना अटक
जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन लागू केले होते. या काळात २६ लाख ८२ हजार ६७३ रुपये किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. १८११ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७६४ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, लाॅकडाऊन काळात मद्यविक्री करणाऱ्या आस्थापना बंदच होत्या, मात्र जेव्हा सुरू झाल्या, त्या काळात मद्यप्रेमींनी १ कोटी ८९ लाख ७६ हजार १४८ लिटर मद्य रिचविले आहे. त्यात सर्वाधिक चलती राहिली ती देशीची. बिअरच्या विक्रीत १० टक्के घट झाली, तर वाईनच्या विक्रीत ४१.८४ टक्के वाढ झाली आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात १ कोटी २ लाख ६ हजार २१ लिटर मद्याची विक्री झालेली आहे. २४ हजार ७६ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. ८ लाख ३४ हजार ४३५ लिटर रसायन जप्त करण्यात आले आहे. १७०५ लिटर देशी, १८९१ लिटर विदेशी, १७५ लिटर बिअर, ४२३ लिटर बनावट देशी मद्य, ३४० लिटर बनावट विदेशी मद्य, तर ६११ लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. यात ६२ दुचाकी व ७ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण २ कोटी ६६ लाख ११ हजार ५३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२०१९-२० या वर्षात ४५ लाख ४१ हजार ४५५ लिटर विदेशी मद्य विक्री झाली होती, तर मागील वर्षभरात ४३ लाख ४७ हजार ३०३ लिटर मद्य विक्री झाली. बिअरमध्येही ९.९० टक्के घट झाली आहे. आधीच्या वर्षी ४८ लाख ३६ हजार ६७३ लिटर बिअर मद्यपींनी रिचविली होती, तर मागील वर्षभरात ४३ लाख ५७ हजार ९६८ लिटर बिअर रिचविली. वाईनमध्ये मात्र वाढ झाली आहे. २०२० या वर्षात ४९ हजार ५३३ लिटर वाईन रिचवण्यात आली होती, तर मागील वर्षभरात ७० हजार २५६ लिटर वाईनची विक्री झाली.
अशी आहे मद्यविक्री (लिटरमध्ये)...
देशी मद्य : १०२००६२१
विदेशी मद्य : ४३४७३०३
बिअर : ४३५७९६८
वाईन : ७०२५६
एकूण : १८९७६१४८
अशी आहे कारवाई...
एकूण गुन्हे : १८११
आरोपी अटक : ७६४
एकूण मद्य जप्त : २६८२६७३
एकूण मुद्देमाल जप्त : २६६११५३३