जळगाव : ढालगाव ता़ जामनेर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ जिल्हाभरात सध्या २०० हून अधिक उर्दू शाळांसाठी ८४१ शिक्षक कार्यरत असून २६० पदे ही गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत़ त्यामुळे कुठे दोन कुठेत तीन शिक्षकांवरच या शाळांचा कारभार सुरू आहे़ढालगावच्या पालकांना तीन शिक्षकांचे आश्वासन देण्यात आले़ चौथ्या शिक्षकासाठी पंधरा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे़ जिल्हाभरात शिक्षकच नसल्याने शिक्षक आणणार तरी कोठून असा सवाल प्रशासनाकडून उपस्थित केला जात आहे़पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविली जात असून तीही अंतिम टप्प्यात आहेत़ प्राधान्यक्ऱम निवडण्याची प्रक्रिया ३० जून रोजी लॉक झाली असून लवकरच या प्रक्रियेद्वारे शिक्षकांची भरती होऊन रिक्त जागा भरल्या जाणार आहे़ जागा रिक्त त्यात बदली प्रक्रियेत २९ उर्दू शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़पाचोरा तालुक्यातील भोकरी येथील उर्दू शाळेत तर २ शिक्षकांवर ५९५ विद्यार्थ्यांची शाळा भरते़ अशी परिस्थिती असताना शैक्षणिक विकास साधणार कसा, असा सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे़आता माहिती घेण्यासाठी धडपडढालगावच्या विद्यार्थ्यांना घेऊन पालकांना शिक्षकांसाठी थेट जिल्हा परिषद गाठावी लागली होती़ तेव्हा शिक्षण विभागाला जाग येऊन त्यांनी शिक्षकांना रूजू होण्याचे आदेश दिले व शिक्षक दुसऱ्या दिवशी रूजू झाले़ त्यानंतर ही शाळा उघडण्यात आली़ बदली प्रक्रियेत किती शिक्षक रूजू झालेले नाही याची माहिती घेण्याची कार्यवाही प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आता हाती घेण्यात आली असून सोमवारपर्यंत यासंदर्भात माहिती समोर येणार आहे.दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची माहितीच नाहीयु-डायस प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांसह, शिक्षक व शाळांची माहिती संकलीत करून ती अपलोड केली जाते़ मात्र, २०१७ नंतर जिल्हाभरात जिल्हा परिषद शाळांमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याची माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ २०१८ बाबत कुठलीही माहिती विभागाकडे नसून या वर्षाची माहिती अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते १० जूनपर्यंत पूर्ण होणार आहे़ २०१७च्या आकडेवारीनुसार उर्दू माध्यामाच्या २०९ शाळांमध्ये २९ हजार ८१२ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली़
उर्दूच्या २०० शाळांमध्ये २६० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:10 PM