जळगाव : जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव बुधवारी अर्थ विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून त्यास गुरुवारी मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. या वृत्तास वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दुजोरा दिला आहे.जळगाव येथे वैद्यकीय संकूल (मेडीकल हब) उभारणीसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली. त्यानुसार जळगाव-औरंगाबाद मार्गावर चिंचोली येथे हे संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथी, भौतिकोपचारशास्र आणि दंत्त महाविद्यालय उभारण्यात येईल. या संकुलामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल. तसेच १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय या मेडिकल हबमध्ये असेल. चिंचोली शिवारातील ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीतही झाली.त्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्यावतीने मे महिन्यात मान्यता देण्यात आली.त्यासाठी लागणाºया २६५ कोटींच्या निधीचा प्रस्ताव बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अर्थ खात्याकडे सादर करण्यात आला. तो अर्थखात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला. त्यास अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.जळगाव येथे उभारण्यात येणाºया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाºया २६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे सादर करण्यात आला. तो त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविला असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही.- डॉ. तात्याराव लहाने, उप संचालक , वैद्यकीय शिक्षण विभाग
जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी २६५ कोटीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 1:39 PM
१०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
ठळक मुद्दे चिंचोली येथे हे संकुल उभारले जाणार वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अर्थ खात्याकडे प्रस्ताव