शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

जळगाव जिल्ह्यात २६८ तर शहरात ७८ नव्या रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:49 PM

कोरोनाचा कहर थांबेना

जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग थांबत नसून शनिवारी ७८ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ यात तानाजी मालुसरे नगरात सर्वाधिक ५ रुग्ण आढळून आले आहेत़ दरम्यान, महापालिकेच्या वैद्यकीय विभाग कोरोनाच्या विळख्यात सापडला असून आधीच मनुष्यबळ कमी असलेल्या यंत्रणेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़शहरातील रुग्णसंख्या अडीच हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे़ त्यात प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक डॉक्टर्स तसेच तंत्रज्ञ बाधित आढळून आल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत़ कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून मनुष्यबळ मात्र, घटल्याने आता नेमके नियोजन कसे करावे, हा गंभीर प्रश्न समोर असून आधीच मनुष्यबळासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचा सूर उमटत आहेत़दहा रुग्णांचा मृत्यूजिल्हाभरात दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ सातत्याने आठवडाभरापासून दहा रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे़ यात जामनेर ३, जळगाव तालुका २, एरंडोल, यावल, रावेर, धरणगाव मुक्ताईनगर येथील बाधित रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे़या भागात आढळले रुग्णपोलीस लाईन ४, शाहूनगर ४, कांचननगर ३, आशाबाबानगर २, बळीरामपेठ २, अयोध्यानगर २, रणछोडदासगनर २, तानाजी मालुसरे नगर ५, दिनकर नगर १, जानकीनगर १, गांधीनगर ३ काही रुग्णांचे रहिवास क्षेत्र रात्री उशिरापर्यंत समोर आलेले नव्हते़जिल्ह्यात २६८ नवे रुग्णशुक्रवारी जिल्ह्यात १२०९ अहवाल प्राप्त होऊन त्यातनू २६८ नवे रुग्ण समोर आले आहेत़ दरम्यान, २०९ रुग्णांनी कोरोनावर मात करून त्यांना घरी सोडण्यात आले असून दहा बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे़ बरे होणाऱ्यांची संख्या ६०४३ झाली आहे़जिल्हाभरात रुग्णसंख्या वाढत आहे़ रुग्णसंख्या ९४५१ वर पोहोचली असून मृतांची संख्या ४६० झाली आहे़ जळगाव शहरात व चोपडा शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर आले आहेत़शनिवारच्या अहवालांमध्ये जळगाव शहरात ७८ तर चोपडा येथे ४२ रुग्ण आढळून आले़ दरम्यान, जिल्हाभरातील उपचार सुरू असलेल्या २९४८ रुग्णांपैकी १९६१ रुग्णांना लक्षणे नाहीत़ते आयसीयू सुरू होण्याच्या प्रतीक्षेतकोविड रुग्णालयात नूतनीकरण होऊन उद्घाटन झालेले अतिदक्षता विभाग शनिवारीही सुरू झालेले नव्हते, ते रविवार किंवा सोमवारी सुरू होणार असल्याची माहिती आहे़ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचे उद्घाटन करण्यात आले़ दरम्यान, बांधकाम विभागाकडील काही कामांमुळे आयसीयूचे कामा विलंब झाल्याचे सांगितले जात आह़ेत्या व्हेंटीलेटर्सवर असेल बारकाईने लक्षया अतिदक्षता विभागात पीएम केअरकडून आलेले पाच व्हेंटीलेटर बसविण्यात आले आहे़ या व्हेंटीलेटर्सचा डेमो झाला आहे़ त्यात कसलीही अडचण आढळली नाही़ मात्र, तरीही प्रत्यक्ष ते कार्यान्वयीत झाल्यानंतर त्याची क्षमता समजणार असून या पाचही व्हेंटीलेटर्सवर अधिक लक्ष असणार आहे़ मॉनीटर्सवर सातत्याने बघून त्यांची कार्यपद्धती तपासली जाणार आहे़ सावधानताने ते हाताळले जातील, असे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले़ यासह आॅक्सिजन पुरवठ्यासाठी इंट्रा नेझल आॅकिसजन कॅन्यूअल हे ११ मशिन्स आले असून त्यापैकी दोन हे नव्या आयसीयूत बसविण्यात आले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव