जळगावात इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला २७ कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:31 PM2018-04-08T12:31:00+5:302018-04-08T12:31:00+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

27 activists of Congress protest against Jalgaon fuel price hike | जळगावात इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला २७ कार्यकर्ते

जळगावात इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला २७ कार्यकर्ते

Next
ठळक मुद्देजिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठनिवेदन देण्यासाठी २० मिनिटांची प्रतीक्षा

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ८ - इंधन दरवाढीच्या विरोधात शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आंदोलन करण्यात येऊन सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात फक्त २७ पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसून आले. नंतर निवेदन देताना यात थोडी भर पडली.
पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने याची झळ सामान्य जनतेला सहन करावी लागत आहे. त्या विरोधात शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस डी.जी. पाटील,महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, महानगरचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हाती सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन तर काही जणांनी महागाई दर्शविणाºया फलकांचा कोट परिधान करून आंदोलनात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर येऊन सर्वांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, इंधनाचे दर दररोज बदलत असल्याने ते लक्षात येत नाही, मात्र सरकार यात सातत्याने वाढ करीत असून ही छुपी वाढ असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यात इंधनाच्या दरात तफावत असल्याचेही म्हटले आहे.
आंदोलनाकडे पाठ
इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील हेदेखील सहभागी नव्हते. त्यांच्या वडिलांची प्रकृती ठिक नसल्याचे कार्यकर्त्यांच्यावतीने सांगण्यात आले. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त निवेदनावर नाव असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस शिरीष चौधरी, अ‍ॅड. ललिता पाटील हेदेखील आंदोलनात सहभागी नव्हते. इतकेच नव्हे तर अगोदर केवळ २७ पदाधिकारी व कार्यकर्ते होते, नंतर काही जण आल्याने ही संख्या ३५ पर्यंत पोहचली.
निवेदन देण्यासाठी २० मिनिटांची प्रतीक्षा
आंदोलक निवेदन देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे दालनात नसल्याचे समजले. निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या दालनात गेले असता तेदेखील जेवणासाठी घरी गेल्याचे समजले. त्यामुळे निवेदन स्वीकारण्यास अधिकारी नसल्याने २० मिनिटे आंदोलक बसून होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी अधिकाºयांना संपर्क साधत त्यांना आंदोलनाबाबत कळविले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील आले व त्यांनी निवेदन स्वीकारले.

वडिलांची प्रकृती ठिक नसल्याने आजच्या आंदोलनात सहभागी होता आले नाही. मात्र या बाबत सर्वांना सूचना देऊन आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.
- अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: 27 activists of Congress protest against Jalgaon fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.