लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत, शिवसेना भाजपला धूळ चारून महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. या निवडणुकीत भाजपच्या तब्बल २७ नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. सत्ताधारी भाजपला केवळ ३० नगरसेवक आपल्या पाठीशी ठेवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे शिवाजीनगर भागातील आठ ही नगरसेवक शिवसेनेच्या गोटात जाऊन सामील झाले आहेत.
रविवारी भाजपचे नगरसेवक फरार झाल्यानंतर फुटलेल्या नगरसेवकांच्या आकड्याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते. मात्र, निवडणुकीच्या अखेर ही संख्या २७ वर जाऊन पोहोचली आहे. सोमवार पर्यंत शिवसेनेकडे २५ नगरसेवक फुटले होते. शेवटच्या दोन दिवसात शिवसेनेने भाजपचे दोन नगरसेवक फोडून ही संख्या २७ वर पोहोचली.
गुरुवारी सकाळीच ज्योती चव्हाण ही आल्या शिवसेनेच्या गोटात
भाजपचे काही नगरसेवक रविवारी गायब झाल्यानंतर भाजप ने उर्वरित नगरसेवकांना नाशिक येथे रवाना केले होते. यामध्ये भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण या देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र गुरुवारी निवडणुकीच्या काही तास आधी ज्योती चव्हाण या नाशिक हुन निघून सकाळी सात वाजेच्या सुमारास ठाणे येथे जाऊन शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्या.
भाजपमधून फुटलेले नगरसेवक
प्रभाग क्रमांक 1
प्रिया जोहरे
सरिता नेरकर
ॲड. दिलीप पोकळे
खान रूकसान बी गबलु
प्रभाग क्रमांक 2
कांचन सोनवणे
नवनाथ दारकुंडे
गायत्री शिंदे
किशोर बाविस्कर
प्रभाग क्रमांक 3
मीना सपकाळे
दत्तू कोळी
रंजना सपकाळे
प्रवीण कोल्हे
प्रभाग क्रमांक 4
चेतन सनकत
प्रभाग 7
प्रा. सचिन पाटील
प्रभाग क्रमांक 8
प्रतिभा पाटील
प्रभाग क्रमांक 9
प्रतिभा देशमुख
प्रभाग क्रमांक 10
कुलभूषण पाटील
प्रभाग क्रमांक 11
ललित कोल्हे
पार्वताबाई भिल
सिंधूताई कोल्हे
प्रभाग 13
ज्योती चव्हाण
प्रभाग क्रमांक 14
रेखा पाटील
सुरेखा सोनवणे
प्रभाग क्रमांक 16
रेश्मा काळे
मनोज अहुजा
प्रभाग क्रमांक 17
सुनील खडके
मीनाक्षी पाटील
-----
भाजपमध्ये असलेले नगरसेवक
प्रभाग 4
भारती सोनवणे
चेतना चौधरी
मुकुंदा सोनवणे
प्रभाग 6
ॲड.शुचिता हाडा
धिरज सोनवणे
अमित काळे
मंगला चौधरी
प्रभाग 7
सीमा भोळे
अश्विन सोनवणे
दीपमाला काळे
प्रभाग 8
डॉ.चंद्रशेखर पाटील
लता भोईटे
प्रभाग ९
विजय पाटील
प्रतिभा कापसे
मयुर कापसे
प्रभाग १०
सुरेश सोनवणे
शोभा बारी
शेख हसीनाबी शरीफ
प्रभाग ११
उषा पाटील
प्रभाग 12
उज्वला बेंडाळे
गायत्री राणे
प्रभाग 13
जितेंद्र मराठे
अंजना सोनवणे
सुरेखा तायडे
प्रभाग 14
सदाशिव ढेकळे
राजेंद्र घुगे पाटील
प्रभाग 16
भगत बालानी
रजनी अत्तरदे
प्रभाग १७
विश्वनाथ खडके
रंजना सोनार