अमळनेर : विधी सेवा प्राधिकरण मुंबई व अंतर्गत विधी सेवा समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जानवे येथे फिरते न्यायालय घेण्यात येऊन फौजदारी स्वरूपाच्या २६ व दिवाणी स्वरूपाचा एक दावा निकाली काढण्यात आला.
सकाळी फिरत्या न्यायालयाच्या वाहनाचे न्यायालय परिसरात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर फिरते न्यायालय जानवे येथे नेण्यात आले. त्याठिकाणी न्या. एसएस अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन ग्रामस्थांना फिरत्या न्यायालयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. लोकांचा पैसा, वेळ वाचवून आपसातील वाद मिटवून नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी,आपसात समजोता करण्यासाठी या न्यायालयाची स्थापना करण्यात आल्याचे वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड. राकेश पाटील यांनी सांगितले. ॲड. शैलेश ब्रम्हे यांनी मार्गदर्शन केले. न्या. अग्रवाल यांच्यासमोर कामकाज चालले. पंच म्हणून ॲड. अनामिका महाजन, ॲड. किरण पाटील, ॲड. प्रदीप पाटील, ॲड. गोपाळ सोनवणे यांनी काम पाहिले. यावेळी न्या. कराडे, सरकारी अभियोक्ता किशोर बागुल, ॲड. राजेंद्र चौधरी, जयेश पाटील ,गटविकास अधिकारी एस. बी. सोनवणे , विस्तार अधिकारी अनिल राणे, हितेश चिंचोरे, ग्रामविकास अधिकारी के. आर. देसले, तलाठी पोलीस पाटील विलास पाटील उपस्थित होते.