शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बांधकाम कामगारांच्या पोटात २८ कोटींचे भोजन; लाभार्थ्यांच्या संख्येत १३ पटीने वाढ

By विलास बारी | Published: October 08, 2023 11:38 AM

लाभार्थींच्या संख्येत या काळात एक दोन नव्हे, तर तब्बल १३ पटीने वाढ झाली आहे.

जळगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम  कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडून नोंदीत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह व रात्रकालीन भोजन योजनेचे लाभार्थी जळगाव जिल्ह्यात ‘दिन दुगना रात चाैगुना’ झाले आहे. त्यामुळेच अवघ्या नऊ महिन्यात या योजनेवरील खर्च २ कोटींवरून २८ कोटी २५ लाखांवर पोहचला आहे. लाभार्थींच्या संख्येत या काळात एक दोन नव्हे, तर तब्बल १३ पटीने वाढ झाली आहे.

राज्यातील २६ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रकालीन जेवण योजना ऑगस्ट २०२१ पासून सुरू केली. जळगाव, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अहमदनगर जिल्ह्यात भोजन पुरविण्यासाठी मे. इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रा. लि. या कंपनीसोबत करार केला आहे. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान झालेले दुर्लक्ष, बांधकाम मजुरांऐवजी दुसऱ्याच याद्यांना दिलेली मंजुरी या सर्व बाबी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण सपकाळे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघड केल्या आहेत.

काम न झालेल्या ठिकाणी भोजन nसाकेगाव, ता.भुसावळ ग्रा. पं.ने ५ मार्च २०२३ रोजी वेळू माता मंदिर येथे सुरू असलेल्या बांधकाम साइटवर ८११ कामगारांना भोजन पुरविण्याबाबत पत्र दिले. मात्र मंदिर परिसरात या काळात कोणतेही बांधकाम झालेले नाही. 

- १२०० मतदार असलेल्या वसंतवाडी, (ता.जळगाव) या ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार १२ मार्च २०२३ पासून ११७४ कामगारांना भोजन दिल्याचे दाखविले 

ग्रामपंचायतीकडून आलेल्या मजुरांच्या याद्यांना मंजुरी दिली आहे. ठेकेदाराने भोजन पुरविल्याचे डिलिव्हरी चलन सादर केले. त्याआधारे बिलांच्या मंजुरीसाठी शिफारस केली आहे. सात ते आठ ठिकाणी स्पाॅट व्हिजिट केल्या आहेत. अपूर्ण मनुष्यबळामुळे पडताळणी करता आली नाही.                - चंद्रकांत बिरार, सहायक कामगार आयुक्त, जळगाव 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रfoodअन्नState Governmentराज्य सरकार