लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात घरकुलांची कामे सुरू असून यातील २८ हजार २६१ घरकुलांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेसाठी ग्रामीण भागासाठी पात्र लाभार्थ्यांना एक लाख २० हजारांची तीन हप्त्यांमध्ये मदत केली जाते. दरम्यान, जिल्हाभरात २९ हजार ७२३ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहे.
जणगणनेनुसार जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची यादी काढण्यात आली होती. २०१६ मध्ये या यादीनुसार पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी ठरविण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात ७३ हजार १८० घरकुलांना मंजुरी देऊन ती बांधण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अशी मिळते रक्कम
घरकुलात घर मंजूर झाल्यानंतर पहिला पंधरा हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. त्यानुसार पुढील बांधकामाची परिस्थिीती बघून इंजिनिअर पाहणीसाठी येतात व त्यानंतर मग आवास ॲपवर याचे फोटो अपलोड केले जातात. त्यानुसार पुढील ४० हजारांचा हप्ता लाभार्थीला प्राप्त होत असतो. त्यानंतर ४० हजार आणि शेवटचा २० हजार असे चार हप्ते या योजनेअंतर्गत लाभार्थींना मिळतात. कामाच्या प्रगतीनुसार ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होत असते.
आवास योजनेची स्थिती
मंजूर घरकुले ७३१८०
पहिला हप्ता मिळालेले लाभार्थी : ४४८१९
२८ हजार २६१ लोकांना पुढील हप्ता मिळणे बाकी आहे.