जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी असले तरी भारतात ते सातत्याने वाढत असून रुपयाच्या घसरणीमुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. आॅगस्टमध्ये २९ दिवसात पेट्रोलच्या दरात तब्बल १५ वेळा तर डिझेलच्या दरात १९ वेळा वाढ झाली. दरम्यान, दररोज २ पैशांपासून ते ८० पैशांपर्यंत दर वाढून या २९ दिवसात पेट्रोलचे दर १.८८ रुपये व डिझेलचे दर २.०५ रुपयांनी वाढले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी असले तरी भारतात हे दर वाढत असल्याचे चित्र आहे. या बाबत इंधन विक्रेत्यांकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची मोठी घसरण होत असल्याने भारतात इंधन दरवाढ कायम आहे. बुधवारी तर रुपयाची ऐतिहासिक घसरण होऊन डॉलरचा दर तब्बल ७०.५२ रुपयांवर गेला. दिवसेंदिवस रुपयांतील या घसरणीमुळेच इंधनाचे दर वाढत असल्याचे जळगाव जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मध्यंतरी रुपया सावरण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी इंधनाचे दर स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नोव्हेंबरनंतर मोठ्या ‘भडक्या’ची शक्यतासध्या अमेरिका इराणवर मोठा दबाव आणत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम होत आहे. इतर देशांनी इराणकडून इंधन खरेदी न करता इतर पर्यायांसाठी अमेरिकेकडून हा दबाव टाकला जात असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यात इंधन खरेदीत भारत हा जगातील द्वितीय क्रमांकाचा ग्राहक असून अमेरिकेचा हा दबाब कायम राहिल्यास भारतात आणखी मोठ्या इंधन दरवाढीची शक्यता इंधन विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.वाढते दरआॅगस्ट महिन्याचा विचार केला तर २९ दिवसात पेट्रोलच्या दरात तब्बल १५ वेळा तर डिझेलच्या दरात १९ वेळा वाढ झाली. १ आॅगस्ट रोजी ८४.६८ रुपयांवर असलेल्या पेट्रोलच्या दरात दररोज ८ किंवा १० पैशांनी वाढ होऊन ते ८६.५६ रुपयांवर पोहचले. तसेच १ रोजी ७१.८१ रुपये असलेल्या डिझेलच्याही भावात अशीच थोडी थोडी वाढ होऊन ते २९ रोजी ७३.८६ रुपयांवर पोहचले.अशी झाली वाढपेट्रोल : २ आॅगस्ट - १७ पैसे, ३ आॅगस्ट - ७ पैसे, ४ आॅगस्ट - २० पैसे, ५ आॅगस्ट - १५ पैसे, ६ आॅगस्ट - ११ पैसे, ७ आॅगस्ट - ९ पैसे, १० आॅगस्ट - ७ पैसे, १० आॅगस्ट - ७ पैसे, ११ आॅगस्ट - १० पैसे, १८ आॅगस्ट - ६२ पैसे, २० आॅगस्ट - ८० पैसे, २१ आॅगस्ट - ९ पैसे, २४ आॅगस्ट - ९ पैसे, २६ आॅगस्ट - ११ पैसे, २८ आॅगस्ट - ४० पैसे, २९ आॅगस्ट - १३ पैसे.डिझेल : २ आॅगस्ट - १७ पैसे, ३ आॅगस्ट - ९ पैसे, ४ आॅगस्ट - १९ पैसे, ५ आॅगस्ट - १२ पैसे, ६ आॅगस्ट - १३ पैसे, ७ आॅगस्ट - ६ पैसे, १० आॅगस्ट - ७ पैसे, १० आॅगस्ट - ७ पैसे, ११ आॅगस्ट - १५ पैसे, १६ आॅगस्ट - ७८ पैसे, १७ आॅगस्ट - ८ पैसे, १९ आॅगस्ट - ६ पैसे, २० आॅगस्ट - १३ पैसे, २२ आॅगस्ट - ६ पैसे, २४ आॅगस्ट - १४ पैसे, २६ आॅगस्ट - १५ पैसे, २७ आॅगस्ट - १४ पैसे, २८ आॅगस्ट - १६ पैसे, २९ आॅगस्ट - १४ पैसे.आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी असले तरी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण होत असल्याने भारतात इंधनाचे दर वाढतआहे.-प्रकाश चौबे, अध्यक्ष, जळगाव जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन.
२९ दिवसात पेट्रोलच्या दरात १५ वेळा तर डिझेलच्या दरात १९ वेळा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:55 AM
ग्राहकांना फटका
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय पातळीवर दर कमी असले तरी रुपयाच्या घसरणीचा परिणामनोव्हेंबरनंतर मोठ्या ‘भडक्या’ची शक्यता