प्रसाद धर्माधिकारी ।नशिराबाद : विवाह सोहळ्याचा धूमधडाका, शुभ मंगल सावधानसह सनई चौघड्यांचा स्वर सर्वत्र तुलसी विवाहानंतर गुंजला आहे. मात्र गुरू अस्तामुळे तब्बल ३६ दिवस विवाहाचा धूमधडाक्याला ब्रेक लागणार आहे. १८ जानेवारीपासून विवाहाचा धूमधडाका पुन्हा सुरू होईल. जानेवारी ते जून दरम्यान तब्बल ३९ विवाह मुहूर्त शिल्लक आहे. डिसेंबरमध्ये १२ तारीख शेवटचा मुहूर्त आहे.यंदा तुलसी विवाहनंतर तब्बल अकरा दिवसानंतर विवाह मुहूतार्ला प्रारंभ झाला आहे. त्यातच १७ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान गुरूचा अस्त असल्याने त्या कालखंडात विवाह मुहूर्त नाही.१७ डिसेंबर पासून गुरू अस्तामुळे पुढे ३६ दिवस एकही विवाह मुहूर्त नाही.सोळा संस्कारात विवाह सोहळ्याला अनन्य महत्व आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यान चातुमार्सात विवाह सोहळा बंद असतात. तुळशी विवाहानंतर शिवाचा धुमधडाका सुरू होत असतो. यंदा नऊ नोव्हेंबरला तुलसीविवाह आरंभ झाला. तुळशी विवाहानंतर यंदा अकरा दिवस विवाह मुहूर्त नव्हते.डिसेंबरमध्ये १२ तारीख शेवटचा मुहूर्त आहे. १७ डिसेंबर रोजी गुरु ग्रह अस्त होत आहे, त्यानंतर सात जानेवारीला गुरु उदय होईल. या कालखंडात एकही विवाह मुहूर्त नाही. यंदा विवाह मुहूर्ताचे प्रमाण कमी असल्याने उपवर वधू-वरांच्या पालकांची विवाह तयारीसाठी चांगलीच तारांबळ उडणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान पुढील वर्षी मे महिन्यात १० मुहूर्त आहेत.विवाह मुहूर्त याप्रमाणेजानेवारी २०२० - १८, २०, २९, ३०, ३१फेब्रुवारी- १, ४, १२, १३, १४, १६, २६, २७मार्च- ३, ५, ८, ११, १२, १९एप्रिल -१५, १६, २६, २७मे -३, ५, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४जून- ११, १४, १५, २५, २९, ३०
विवाह मुहूर्तांना ३६ दिवसांचा ब्रेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 1:26 PM