जामनेर, जि.जळगाव : तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाने कांग, वाघूर व सोन नदीला मोठा पूर आला. कांग नदीला आलेल्या पुरामुळे शनिवारी दुपारी जामनेरमधील पूल पाण्याखाली गेल्याने भुसावळकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती. वाघूर धरणातून ४० हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती धरण विभागातील सूत्रांनी दिली.अजिंठा डोंगर परिसरात शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. वाघूरला पूर आल्याने पहूर व नेरी येथील पात्र खळाळून वाहत होते. काल दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी नुकसानी पंचनामे झाले. आज तळेगाव येथे पंचनाम्यासाठी जात असलेले कृषी विभागातील कर्मचारी, तलाठी बेलेश्वर नदीला पूर असल्याने गावात पोहचू शकले नाही.रात्रभर झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले. पंचनाम्यासाठी शेतात जाणेदेखील अवघड होत आहे. आधीच पिके हातातून गेली. उरली सुरली होत असलेल्या पावसाने नष्ट होत आहे. ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडला असून, त्याला शासनाने मदत करण्याची गरज आहे.
वाघूरचे २० दरवाजे पुन्हा उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 4:41 PM
जोरदार पावसाने कांग, वाघूर व सोन नदीला मोठा पूर आला.
ठळक मुद्देकांग, वाघूरला पूर, पीक पंचनामे रखडलेपूल पाण्याखाली गेल्याने भुसावळकडे जाणारी वाहतूक बंदवाघूर धरणातून ४० हजार क्युसेसने पाण्याचा विसर्गअजिंठा डोंगर परिसरात दिवसभर मुसळधार पाऊस