जळगाव : कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरातील हॉकर्स, फळ, भाजीपाला, किराणा अशा विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेत दोन दिवसात २५६ विक्रेत्यांची तपासणी झाली असून त्यातील तीन जण बाधित आढळून आले आहे़ तिघांनाही कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे़या तपासणी मोहिमेने शहरातील मोठा संसर्ग टाळता येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़ ३० आॅगस्टपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे़ यात वैद्यकीय अधिकारी डॉ़ संजय पाटील हे तपासणी करीत आहेत़ कोविड रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात कार्यरत डॉ़ वैभव सोनार यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता़ मात्र, त्यांचीही प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात दाखल असून आता डॉ़ इरफान पठाण यांच्याकडे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे़७२ नवे रुग्ण, ८८ बरेशहरात गुरूवारी ७२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ८८ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ यासह तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे़ बाधितांची रुग्णसंख्या ४७०० तर मृतांची संख्या १३७ वर पोहोचली आहे़ ३५६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ९९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ जिल्हाभरात १२ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून यात धरणगाव व पाचोरा तालुक्यातील ४० वर्षी दोन तरूणांचा समावेश आहे़ यासह जळगाव शहरातील ३, अमळनेर, जळगाव तालुक्यातील प्रत्येकी २ तसेच पाचोरा, चाळीसगाव, यावल तालुक्यातील १ बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे़ यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४ मृत्यू झाले आहेत़
तपासणी मोहीमेत ३ हॉकर्स बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:50 AM