जळगाव- शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहाच्या बाजूने समांतर रस्त्यांचे काम करताना अतिक्रमण असल्याने अडथळा येत, असल्याने सोमवारी मनपाच्या अतिक्रमण विभाग व ह्यनहीह्ण यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली़ दरम्यान, अतिक्रमण विभागाकडून समांतर रस्त्यावरील १० झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्या़ मात्र, परंतू महामार्गालगतच्या अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने केवळ महामार्गाचे सिमांकन करून रस्त्यात कोणते कोणते अतिक्रमण येते याची नोंदह्यनहीह्णच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.महार्गाच्या समांतर रस्त्याचा अतिक्रमणामुळे कामाला विलंब होत आहे, असे पत्र समांतर रस्त्यांचे काम करणाºया झेंडू इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (नही) दिले होते. यामुळे नही व महापालिका महामार्गाशेजारी अतिक्रमण काढण्याची कारवाई सोमवारी सुरू केली. यावेळी नहीचे आर. व्ही. सपकाळे यांच्या अन्य अधिकारी तसेच महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग अधिक्षक एच. एम. खान यांचे पथक सोमवारी महामार्गावरील कालिंकामाता मंदिराजवळून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली. परंतू कारवाई प्रसंगी पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई न करता महामार्गाचे दोघा बाजूचे सिमांकन करून अतिक्रमण कोणते येते हे निश्चित केले.अतिक्रमण विभागाने काढल्या १० झोपड्याकारवाईला सुरूवात झाल्यानंतर कालिंकामाता मंदिरा जवळील हॉटेल गोकूळच्या समोरील बाजूला समांतर रस्त्याच्या हद्दीत येणाºया १० झोपड्या या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाडून काढण्यात आल्या़ झोपड्या जमिनदोस्त करीत असताना झोपडतील नागरिकांना पथकातील कर्मचाºयांशी वाद घातल्यामुळे किरकोळ गोंधळ निर्माण झाला होता़ त्यामुळे महामार्गावर या नागरिकांच्या झोपडीतील सामान रस्त्यावर पडून होता.पोलिस बंदोबस्त मिळाला नाहीसोमवारी सकाळी महामागार्वरील अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी नही व महापालिकेचे पथक गेले. परंतू पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाºयांनी पोलिस बंदोबस्त मिळत नाही तो पर्यंत कारवाई केली जाणार नाही असे नहीला सांगितले.