आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त जागांमुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी आता जिल्ह्याला सात कायमस्वरुपी (परमानंट) तर २२ बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी मिळाले असून ते एक ते दोन दिवसात रूजू होणार आहे. या सोबत मुंबई येथून एक वरिष्ठ अधिकारीदेखील येणार आहेत.जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, कुटीर रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होऊन रुग्णांचे हाल होत आहे. या संदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वैद्यकीय अधिकाºयांचे रिक्त पदे भरा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर आरोग्य विभागासही तसे पत्र दिले होते.या पत्रास उत्तर म्हणून वैद्यकीय अधिकाºयांचे पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी खडसे यांना कळविले होते. या रिक्त पदांसर्भात १५ रोजी ९ जागांसाठी जाहिरात काढण्यात येऊन २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले. यात २३ रोजी उमेदवारांची मुलाखत होणार होती, मात्र ती काही कारणास्तव झाली नाही. ही मुलाखत आता २४ रोजी होणार आहे. यामध्ये ५ अर्ज आलेले आहे.या व्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाºयांचे जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ््या आरोग्य केंद्रांसाठी आदेश (आॅर्डर) काढले आहेत. या सात वैद्यकीय अधिकाºयांपैकी पाल व वरणगाव येथे प्रत्येकी दोन, पहूर, बोदवड, मुक्ताईनगर येथे प्रत्येकी एक असे वैद्यकीय अधिकारी एक ते दोन दिवसात रूजू होणार आहेत.२२ बंधपत्रित अधिकाºयांचेही काढले आदेशकायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी मिळण्यासोबतच आरोग्य उपसंचालकांनीदेखील जिल्ह्यासाठी २२ बंधपत्रित वैद्यकीय अधिकाºयांचे आदेश काढले आहेत. हे अधिकारीदेखील आठवडाभरात रूजू होणार असल्याचे सांगण्यात आले. या सोबतच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयासाठी मुंबई येथील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीही नियुक्त होणार आहे.यामुळे आता जिल्ह्यात आता वैद्यकीय अधिकाºयांचा सुकाळ होणार असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी सात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाºयांचे आदेश निघाले आहेत. नऊ जागांसाठी स्थानिक पातळीवर जाहिरात देण्यात आली व यासाठी पाच अर्ज आले होते. या पाच जणांची २४ रोजी मुलाखत होणार आहे तर २२ बंधपत्रित वैद्यकीय अधिकाºयांचेही आदेश निघालेले आहेत.- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.
जळगाव जिल्ह्याला मिळाले ३० वैद्यकीय अधिकारी, दर्जेदार रुग्णसेवेची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:10 PM
७ कायमस्वरुपी अधिकाºयांचा समावेश
ठळक मुद्देएक-दोन दिवसात होणार रुजू एकनाथ खडसे यांनी दिला होता उपोषणाचा इशारा