जळगाव : कृषी कायदे रद्द करण्यासाठी सर्व शेतकरी सघंटनानी भारत बंदची हाक दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीसह तीस संघटनांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवून बंद यशस्वी करण्याचे कामगार संघटनांना आवाहन केलेले आहे. या नियोजनाबाबत अजिंठा विश्रामगृहात बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
लोक संघर्ष मोर्चा व कामगार सघंटना सयुंक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) महाराष्ट्रभर बंद मध्ये सहभागी होवुन निदर्शने करणार आहे. जळगाव जिल्हा सुध्दा बंद यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ,लोक संघर्ष मोर्चा ,कामगार संघटनांची आघाडी, अनेक पुरोगामी संघटना याची बैठक यांची बैठक पार पडली. बैठकीस लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा्यक्ष रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, मुकुंद सपकाळे, शिवसेना शहरप्रमुख शरद तायडे , राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, शाम तायडे, जमील शेख, सुरेंद्र पाटील, विलास पाटील, भारत सासणे, अमोल कोल्हे, विजय सुरवाडे, साजिद शेख, शालीग्राम मालकर, विजय पवार, ॲड. सचिन पाटील, ॲड. सचिन सिंघ, फारुख शेख, प्रमोद पाटील, सचिन धांडे, विष्णू भंगाळे, आय्याज अली, प्रा. करीम सालार असे ३०संघटना व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे झाले निर्णय
जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिक व्यापारी संघटना, बाजार समिती , ट्रक असोसिएशन, रिक्षा चालकाची संघटना हमाल मापडी संघटना, सर्व पुरोगामी संघटनांच्या व पक्षच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जिल्ह्यात महाविकास आघाडीतील पक्ष व लोक संघर्ष मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सकाळी ९ वाजता टॉवर चौक येथून मोटार सायकल रॅली काढून बंदचे आवाहन करणार आहेत, जिल्हाधिकारी यांना निवदेन देणार आहेत.