अजय पाटील ।जळगाव : मनपा निवडणुकीसाठी केवळ ११ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ५ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून दिली असली तरी प्रत्यक्षात एका उमेदवाराला मात्र किमान ३० ते ४० लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी महागाई वाढली आहे. त्याच प्रमाणे नवीन प्रभाग रचनेमध्ये प्रभागातील मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ३०० कोटींचा चुराडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अनेक आजी-माजी नगरसेवक खाजगीत सांगतात की, निवडणुकीच्या काळात कुणालाच नाराज करून चालत नाही. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये जेवण, पार्ट्या यावर खर्च करावाच लागतो. प्रचारासाठी बाहेरून येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे हॉटेल, लॉज फुल्ल होतात. तसेच दररोज प्रचार फेरीत गर्दी दिसावी यासाठी काही महिला व पुरुषांना रोजंदारीने लावावे लागते. त्यावरही उमेदवारांचा खर्च होत असतो. तो आता होऊ लागला आहे. उमेदवारांकडून आता त्यांच्या परिसरात ठिकठिकाणी संपर्क कार्यालये उभारण्यात आली आहे. त्यावरही खर्च होत आहे. पूर्वी संपर्क कार्यालये नसायची. काही श्रीमंत उमेदवारांकडूनच संपर्क कार्यालये उघडली जायची मात्र आता अनेक उमेदवार कार्यकर्त्यांसाठी ही कार्यालये उघडतात. मतदार चिठ्ठ्याही घरोघरी पोहचविण्यासाठी उमेदवार आता मेहनत घेतात व त्यावरही ते खर्च करतात.उमेदवार वैयक्तीक त्यांच्या प्रभागात तर पैसा खर्च करतात. त्यासाठी उमेदवारी देतानाच संबंधीताची पैसा खर्च करण्याची कुवत आहे की नाही? याचीही चाचपणी केली जाते. मात्र पक्षांकडून वरिष्ठ नेत्यांच्या सभा, रोड-शो देखील आयोजित केले जातात. त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. विशेष म्हणजे हा खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जात नाही.
जळगाव मनपा निवडणुकीत होणार ३०० कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:16 PM
मनपा निवडणुकीसाठी केवळ ११ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ५ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून दिली असली तरी प्रत्यक्षात एका उमेदवाराला मात्र किमान ३० ते ४० लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देमहापालिका निवडणूक महागलीमर्यादेपेक्षा अधिक पटीने होणार छुपा खर्चप्रत्येक उमेदवाराला ५ लाख रुपये खर्चाची मर्यादा