जळगाव - मनपाच्या ७५ जागांसाठी मंगळवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १२४ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३०३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मंगळवारी दिवसभरात १०० उमेदवारांनी माघार घेतली. अपक्षांची मनधरणी करताना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.८२ अपक्ष उमेदवार रिंगणातमनपा निवडणुकीसाठी छाननीनंतर एकूण ४२७ उमेदवार रिंगणात होते. १२४ उमेदवारांच्या माघारीनंतर ३०३ उमेदवार मनपाच्या आखाड्यात आहेत. २०१ पैकी ११९ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ८२ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.तासाभरात ६० उमेदवारांची माघारमाघारीच्या अखेरच्या दिवशी अपक्षांचे मन वळविण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी अनेक अपक्षांना राजकीय आमिष व आश्वासने देण्यात आली. उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या एका तासात तब्बल ६० उमेदवारांनी माघार घेतली. दरम्यान, अनेक उमेदवार माघारीची मुदत संपल्यानंतर मनपात पोहचले त्यामुळे त्यांचे माघारीचे अर्ज स्विकारण्यात आले नाहीत.पक्ष निहाय उमेदवारअपक्ष - ८२भाजपा - ७५शिवसेना - ७०राष्टÑवादी कॉँग्रेस - ४२कॉँग्रेस - १६समाजवादी पार्टी - ६एमआयएम - ६हिंदु महासभा - २बीएचआरएस - २कम्युनिस्ट पार्टी - १
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:11 PM
१२४ उमेदवारांची माघार
ठळक मुद्दे८२ अपक्ष उमेदवार रिंगणाततासाभरात ६० उमेदवारांची माघार